रविकांत तुपकरांचा आज मेहकर आणि लोणार तालुक्यात प्रचार दौरा! लोणार शहरात प्रचार रॅली; सुलतानपूर, जानेफळ, डोणगाव, बेलगाव मध्ये होणार प्रचार सभा!
Apr 13, 2024, 09:57 IST
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सामान्य जनतेचे उमेदवार म्हणून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत आहे. ११ एप्रिलला देऊळघाट, धाड मध्ये झालेल्या सभा, १२ एप्रिलला शेगाव तालुक्यात झालेल्या प्रचार सभांना अलोट गर्दी जमली होती. दरम्यान आज,१३ एप्रिल रोजी रविकांत तुपकर मेहकर विधानसभा क्षेत्रात प्रचार दौरा करणार आहेत. लोणार शहरात आज सकाळी होणाऱ्या प्रचार रॅलीने या दौऱ्याची सुरूवात होणार आहे.
सकाळी ११ वाजता लोणार शहरात प्रचार रॅली, दुपारी ३ वाजता सुलतानपूर येथे प्रचार सभा, संध्याकाळी ५ वाजता जानेफळ येथे प्रचार सभा, संध्याकाळी ७ वाजता डोणगाव येथे प्रचार सभा तर रात्री साडेआठ वाजता बेलगाव येथे प्रचार सभा असा रविकांत तुपकर यांचा आज,१३ एप्रिलचा प्रचार दौरा असणार आहे.