रविकांत तुपकरांच्या प्रचाराचे बॅनर अज्ञातांनी फाडले! तूपकरांचे समर्थक आक्रमक; तुपकर म्हणाले, विरोधकांना पराभवाची चाहूल लागल्याने हे कृत्य...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते तथा बुलडाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्या प्रचाराचे बॅनर अज्ञातांनी फाडून टाकले आहे. येळगाव टोलनाक्याजवळील पुलावर तुपकर यांच्या प्रचाराचे बॅनर लावण्यात आले होते, ते कुणीतरी अज्ञात लोकांनी फाडले आहे.दरम्यान यामुळे शेतकरी आणि रविकांत तुपकर समर्थकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. स्वतः रविकांत तुपकर यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली असून विरोधकांना त्यांच्या पराभवाची चाहूल लागली असल्याने विरोधकांनीच हे कृत्य घडवून आणल्याचा आरोप केला आहे.
  Advt
Advt.👆
शेतकरी नेते तथा बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना मतदारसंघात भरभक्कम पाठींबा मिळतो आहे. गावोगावी होणाऱ्या तुपकर यांच्या सभांना रेकॉर्डब्रेक गर्दी होत आहे. तुपकर यांनी प्रचारात जोरदार मुसंडी घेतल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा आरोप तुपकर समर्थक करीत आहेत. त्यातूनच येळगाव जवळील पुलावर असलेले तुपकरांच्या प्रचाराचे बॅनर फाडण्यात आल्याचा आरोप होत आहे. ही निवडणूक आता जनतेने हाती घेतली आहे, शेतकऱ्याच्या लेकराला संसदेत पाठवायचा निर्धार जनतेने केला आहे.मला जे प्रेम जनतेचे मिळत आहे त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे, जे प्रेम माझ्या नशिबात आहे ते प्रेम त्यांच्या नशिबात नाही.त्यामुळे विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत. मला कसं अडवता येईल याचाच प्लॅन विरोधक करीत आहेत. माझ्या प्रचाराचे बॅनर फाडण्याचा प्रकार त्यातूनच झाल्याचे तुपकर म्हणाले. विरोधकांना आता पराभवाची चाहूल लागली आहे असेही तुपकर म्हणाले.