बलीप्रतीपदेनिमित्त रविकांत तुपकरांनी केले बैल व नांगराचे पूजन! ॲड. शर्वरी तुपकरांनी पाडव्याचे औक्षणही केले रथयात्रेतच! एल्गार रथयात्रेला चिखली - बुलडाणा तालुक्यात प्रचंड प्रतिसाद!

 
बुलडाणा:(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काढलेली एल्गार रथयात्रा १४ व्या नोव्हेंबरला ९ व्या दिवशी बुलडाणा तालुक्यात दाखल झाली. एल्गार रथयात्रेच्या ९ व्या दिवसाचे पहिले गाव चांडोळ येथे तुपकर यांनी बलीप्रतीपदेचा उत्सव साजरा केला. यावेळी तुपकर यांनी बळीराजाच्या बैलांचे व नागराचे पूजन केले. बैलाशिवाय शेतीची कल्पना करणे ही शक्य नव्हते. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल जोडी आणि नांगर असायचा, त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत बळीराजाला सुख समृद्धीचे दिवस यावेत अशी प्रार्थना रविकांत तुपकर यांनी यावेळी केली. दिवाळी पाडव्यानिमित्त एल्गार रथयात्रेदरम्यानच रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲड शर्वरी तुपकर यांनी तुपकर यांचे औक्षण करून दिवाळी पाडवा सण साजरा केला.
  डच
बडबड
रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ५ नोव्हेंबरपासून काढलेल्या एल्गार रथयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यंदाचा दिवाळी सण देखील तुपकर यांनी एल्गार यात्रेतच साजरा केला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुपकर यांनी चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे गावात शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीन कापसाचे पूजन व ठेचा भाकर खाऊन अंधारात दिवाळी साजरी केली. दरम्यान १३ नोव्हेंबरला यात्रेचा मुक्काम भडगाव येथे होता. १४ नोव्हेंबरला बलीप्रतीपदेच्या दिवशी सकाळी यात्रा चांडोळ गावात दाखल झाली. यावेळी बैलजोडी आणि नांगराचे पूजन करून तुपकर यांनी बलीप्रतिपदेचा उत्सव साजरा केला. ॲड.शर्वरी तुपकर यांनी तुपकर यांना दिवाळी पाडव्यानिमित्त औक्षण करून पाडवा सण साजरा केला. पती रविकांत तुपकर यांना शेतकऱ्यांकरीता लढण्याचे बळ दे अशी प्रार्थना यावेळी ॲड शर्वरी तुपकर यांनी केली.
बीबीसीएसबी
तरच बळीचे राज्य येईल..
 
"ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो" अशी प्रार्थना बलीप्रतीपदेला केली जाते. मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला कवडीचाही भाव न देणाऱ्या यंत्रणेला बळीच राज्य नको आहे. त्यांना उद्योगपती चालतात, अदानी अंबानीच कर्ज माफ करायला सरकारजवळ पैसे आहे मात्र मायबाप शेतकऱ्याला साधी नुकसानभरपाई मागायला देखील सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला लोकप्रतिनिधी तयार नाहीत. आपली लढाई लढायला बाहेरून कुणी येणार नाही, आता आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे. जुन्या काळात लढाई केल्याशिवाय राज्य मिळत नव्हत, त्यामुळे बळीच राज्य येवो अशी केवळ प्रार्थना करून चालणार नाही तर त्यासाठी लढाई उभारावी लागेल तरच बळीच राज्य येईल असे रविकांत तुपकर यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना म्हणाले. २० नोव्हेंबरला बुलडाणा येथे होणाऱ्या एल्गार महामोर्चाला शेतकरी,शेतमजूर, तरुणांनी व मायमाऊल्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही तुपकर यांनी केले.
गग
 चिखली बुलडाणा तालुक्यात एल्गार रथयात्रेला प्रचंड प्रतिसाद!
  
 ११ नोव्हेंबरला चिखली तालुक्यात दाखल झालेल्या एल्गार रथयात्रेला तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. चिखली तालुक्यातील ४० पेक्षा अधिक गावांचा प्रवास केल्यानंतर १३ नोव्हेंबरला रायपूर येथून यात्रेचा बुलडाणा तालुक्यातील प्रवास सुरू झाला. १३ नोव्हेंबरला यात्रेचा भडगाव येथे मुक्काम होता. १४ नोव्हेंबरला बुलडाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा, सावळी, चांडोळ, करडी, कुंबेफळ, टाकळी, सातगाव, म्हसला खुर्द, म्हसला बु, जांब, मौंढाळा, धाड, धामणगाव या गावांचा प्रवास करीत एल्गार रथयात्रा यात्रा डोमरूळ येथे मुक्कामी दाखल झाली. यात्रेदरम्यान येणाऱ्या सर्वच गावात एल्गार यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
घन