रविकांत तुपकर म्हणाले, शेट्टींकडून विषयाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न! जिल्ह्यात अन् जिल्ह्याबाहेर कोणत्याही कार्यकर्त्याशी माझा वाद नाही! पक्ष नेतृत्वाच्या कार्यपद्धती व भूमिकेवरच माझे आक्षेप
Aug 3, 2023, 16:28 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी काल कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाबद्दल रोष व्यक्त केला होता. शिवाय स्वतः रविकांत तुपकर यांनीदेखील आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत आहे, आपल्याला संघटनेतून बाहेर काढून टाकण्याचा डाव रचला जात आहे. आपले नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न होत आहे असे म्हणत राजू शेट्टी यांचे नाव न घेता पक्षनेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले होते. त्यानंतर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया समोर आली. हा विषय फार मोठा नाही, जिल्ह्यातल्या दोन कार्यकर्त्यांमधला वाद आहे असे राजू शेट्टी म्हणाले होते. त्यावर आता पुन्हा रविकांत तुपकर यांनी शेट्टी यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे.
कुणाशीही माझा वाद दाखवून विषयाचे गांभीर्य कमी करण्याचा हा प्रयत्न आहे.पक्ष नेतृत्वाच्या कार्यपद्धती व भूमिकेवरच माझे आक्षेप आहेत असं रविकांत तुपकर यांनी म्हटल आहे. जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरच्या कोणत्याही कार्यकर्त्यांशी माझे वाद नाहीत असेही रविकांत तुपकर यांनी म्हटल आहे.