रविकांत तुपकरांनी खामगाव येथील बाबा मस्तान शहा मिया दर्गावर चढवली चादर! मुस्लिम समाजबांधवांशी साधला संवाद
Apr 8, 2024, 09:14 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रविकांत तुपकरांनी शनिवारी ६ एप्रिल रोजी खामगाव येथील मस्तान चौकातील मस्जिद मध्ये बाबा मस्तान शहा मिया दर्गावर चादर चढवून प्रार्थना केली. यावेळी त्यांनी मुस्लिम समाज बांधवांशी संवाद साधला.
सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून मुस्लिम समाज बांधवांचे रोजे सुरू आहेत. त्यात शनिवार ६ एप्रिल रोजी २६ वा रोजा म्हणजे रमजान मधील सर्वात मोठा रोजा असतो. या निमित्ताने रविकांत तुपकर यांनी खामगाव येथील मस्तान चौकात मुस्लिम समाज बांधवांसोबत संवाद साधून त्यांना २६ व्या रोजाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मस्तान चौकातील मज्जिद मध्ये जाऊन बाबा मस्तान शहा मिया दर्गावर चादर चढवून प्रार्थना केली. यानंतर मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने रविकांत तुपकरांचा सत्कार करण्यात आला. जात धर्म आपण कधीच पाहिला नाही. आपल्याकडे जो माणूस असेल त्याचे आपण काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, यापूर्वी जनसामान्यांसाठी आपण प्रामाणिकपणे झटत राहू असे यावे रविकांत तुपकरांनी सांगितले. मुस्लिम समाज हा शब्द पाळणारा समाज आहे, सर्वसामान्य जनता आणि कष्टकरी शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या व नेतृत्वाला निश्चितच यावेळी आम्ही संधी देऊ, अशी ग्वाही मुस्लिम समाज बांधवांनी रविकांत तुपकर यांना दिली. खामगावातील विविध भागात रविवारी भेट देऊन मुस्लिम समाज बांधवांना पवित्र रमजान महिन्यातील २६ व्या रोजाच्या तसेच येणाऱ्या रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.