सोशल मीडियावर रविकांत तुपकरच नंबर वन! जे भल्याभल्यांना जमल नाही,ते तुपकरांनी करून दाखवलं! फेसबुकवर गाठला २ लाख फॉलोवर्सचा टप्पा

 
हद्द

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हल्लीचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडिया हे प्रचार प्रसाराचे अतिशय प्रभावी माध्यम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर देश विदेशातील अनेक मोठे नेते या प्रभावी माध्यमाचा वापर करण्यात यशस्वी ठरले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून तर सोशल मीडियावर प्रचार करण्याचा जोरदार ट्रेण्ड वाढला. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील अनेक नेते सोशल मीडियाच्या प्रेमात आहेत खरे..मात्र याचा प्रभावी अन् नेमका वापर जमलाय तो रविकांत तुपकर यांना. सोशल मीडियावरील फेसबुक या प्लॅटफॉर्मवर २ लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स असणारे रविकांत तुपकर जिल्ह्यातील केवळ दुसरे नेते ठरले आहेत. काँग्रेसच्या जयश्री शेळके यांचेही २ लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत खरे मात्र लाईक आणि कमेंटचा पाऊस त्यांच्या पोस्टवर पडत नसल्याने ते "पेड फॉलोवर्स" असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ७ आमदार आणि १ खासदार अशा ८ लोकप्रतिनिधींना देखील हे जमले नाही. आमदार श्वेताताई महाले वगळता सर्वच लोकप्रतिनिधींचे फॉलोवर्स १ लाखापेक्षा कमी आहेत, आमदार श्वेताताई महाले यांचे फेसबुकवर १ लाख ६५ हजार इतके फॉलोवर्स आहेत. 

 "मी आयुष्यात संपत्ती कमावली नाही, पैसे कमावले नाहीत मात्र जीवापाड प्रेम करणारी, जीव ओवाळून टाकणारी लाखमोलाची माणसं कमावली" असं तुपकर त्यांच्या भाषणात सांगत असतात. तुपकर यांच्या सभा, आंदोलनांना जमणारी गर्दी, सध्या प्रचाराला मिळणारा जोरदार प्रतिसाद पाहता तुपकर म्हणतात ते खरेच अशा प्रतिक्रिया सामान्य मतदारांमधून उमटत आहेत. जशी गर्दी तुपकरांच्या सभांना असते तशीच त्यांच्या चाहत्यांची गर्दी त्यांच्या सोशल मीडिया पेजवरही दिसते. फेसबुक च्या माध्यमातून तुपकर सातत्याने त्यांच्या समर्थकांच्या संपर्कात असतात. फेसबुक पेज च्या माध्यमातून तुपकर यांच्या सभा, प्रचार दौरे, रॅली याची इंत्यभुत माहिती मिळत असते. त्यावर तुपकर समर्थकांच्या लाईक आणि कंमेटचा पाऊस पडत असतो. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचे सोशल मीडियावर ३२ हजार फॉलोवर्स आहेत हे विशेष..