BREKING विधान भवनाकडे जाणाऱ्या रविकांत तुपकरांना, शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले

 
नागपूर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): विधानभवनावर हल्लाबोल आंदोलनासाठी जात असलेल्या रविकांत तुपकर आणि शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले आहे. विधानभवन परिसराच्या दीड किलोमिटर आधीच तुपकर यांना पोलिसांनी रोखले आहे.  
सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी तुपकर यांनी विधानभवनावर हल्लाबोल आंदोलनाची घोषणा केली होती. काल हजारो शेतकरी नागपुरात मुक्कामी पोहचले.आज सकाळपासून शेतकरी मुक्कामी असलेल्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. पोलिसांनी तुपकारांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याचे सांगितले मात्र तुपकर हल्लाबोल आंदोलनावर ठाम होते. साडेनऊला तुपकर आणि हजारो शेतकरी विधानभवनाकडे जाण्यासाठी निघाले. मात्र विधानभवनाच्या दीड किलोमीटर आधीच ५०० पेक्षा अधिक पोलिसांनी तुपकर आणि शेतकऱ्यांना अडवले असून सध्या तणावाची स्थिती आहे..