रविभाऊ महाराष्ट्राला तुमची गरज; आम्ही जीवाची बाजी लावून तुमच्या पाठीशी! पुण्यातल्या बैठकीचा सुर ; बैठकीला सुरूवात...

 
पुणे(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): रविकांत तुपकर यांनी आज पुण्यात बोलावलेल्या राज्यस्तरीय
बैठकीला सुरूवात झाली आहे. राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील तुपकर यांचे समर्थक पुण्यात पोहचले आहेत. आधी तुपकर पदाधिकाऱ्यांचे म्हणने ऐकून घेत आहेत. त्यानंतर शेवटी तुपकर सगळ्यांचे म्हणने विचारात घेऊन निर्णय जाहीर करणार आहेत. रविभाऊ महाराष्ट्र तुमची वाट पाहतोय, आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत अशा भावना बैठकीच्या ठिकाणी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहेत..थोड्याच वेळात शेतकरी चळवळीची पुढील दिशा रविकांत तुपकर स्पष्ट करणार आहेत..