रमजान ईद हा प्रेम, आपुलकी व एकात्मतेचा संदेश देणारा सण ! रविकांत तुपकरांचे प्रतिपादन; ईदगाहवर मुस्लिम समाज बांधवांची गळाभेट घेऊन दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा...

 
बुलडाणा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेचं प्रतीक असणारा सण ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद निमित्त रविकांत तुपकर यांनी आज खामगाव येथे मुस्लिम समाजबांधवांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. रमजान ईद हा प्रेम, आपुलकी व एकात्मतेचा संदेश देणारा सण आहे असे सांगत रविकांत तुपकर यांनी मुस्लिम समाज बांधवांची गळाभेट घेऊन त्यांच्यासोबत रमजान ईदचा आनंद साजरा केला.

सर्वसामान्य जनतेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी आज रमजान ईद निमित्त खामगाव तसेच इतर ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांच्या भेटी घेऊन त्यांना पुष्पगुच्छ व प्रेमाचे आलिंगन देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमज़ान ईद हा सण परस्परांमधील स्नेह व सद्भवाना वृद्धींगत करतो. समाजामध्ये एकतेची भावना व सलोखा अबाधित राहण्यासाठी तसेच मानवतेच्या कल्याणासाठी सर्व मुस्लिम समाजबांधव रमजान ईदला प्रार्थना करतात. रमजान ईद हा प्रेम, आपुलकी व एकात्मतेचा संदेश देणारा सण आहे, असे यावेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले. मुस्लिम समाज बांधवांसोबत सहभागी होऊन त्यांना रमजान ईद च्या शुभेच्छा देत रविकांत तुपकर यांनी त्यांचा उत्साह वाढविला. मुस्लिम समाज बांधवांकडून रविकांत तुपकरांना मिळालेला प्रतिसाद वाखनण्याजोगा होता. "आम्ही आपल्या सोबत आहोत" असा विश्वास मुस्लिम समाज बांधवांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. मुस्लिम समाज बांधवांचा मिळणारा प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा रविकांत तुपकर यांच्यासाठी जमेची बाजू ठरत आहे.