राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे कार्य आदर्शवत ! हभप तुकाराम महाराज यांचे प्रतिपादन; जळगाव जामोद येथे ग्राहक मेळावा, रक्तदान शिबिर संपन्न

 
gyy
जळगाव जामोद ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  संस्था, संघटना विश्वासावर चालतात. राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके, संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांनी ग्राहकांचा विश्वास कमावला आहे. तसेच यासाठी त्यांचे मोठे समर्पण आहे. त्यामुळेच संस्थेची एवढी प्रगती होऊ शकली. राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे कार्य आदर्शवत आहे, असे प्रतिपादन सखारामपूर इलोरा संस्थानचे विश्वस्त हभप तुकाराम महाराज यांनी केले. 

jahirast

        (जाहिरात👆)

जर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीचा ग्राहक मेळावा व रक्तदान शिबिर २३ फेब्रुवारी रोजी येथील नगरपालिका सांस्कृतिक भवनात संपन्न झाले. यावेळी उदघाटक म्हणून ते बोलत होते.  संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांची विशेष उपस्थिती होती. पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेनजीत पाटील, प्रदेश काँग्रेसच्या सचिव स्वातीताई वाकेकर, , शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, बुलडाणा अर्बनचे डॉ. किशोर केला, इलोरा संस्थानचे अध्यक्ष दादासाहेब पाटील, भाजयुमोचे जिल्ह्याध्यक्ष सचिन देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख गजानन वाघ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, राष्ट्रवादीचे संदीप उगले, शिवसेना शहराध्यक्ष रमेश ताडे, ओबीसी नेते समाधान दामधर, न. पा. उपाध्यक्ष संजय पारवे, विलासराव मारोडे, न. प. विरोधी पक्षनेते अर्जुन घोलप, ज्ञानेश्वरी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश राठी, संत तुकाराम नागरी सह. पतसंस्थेचे अध्यक्ष रघुनाथ कौलकर, आदिशक्ती मुक्ताई ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष मनीष गावंडे, , व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. बचतगटांच्या महिलांना आर्थिक सहाय्यता धनादेशाचे वितरण करण्यात आले. संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांनी प्रास्ताविकातून संस्थेचा लेखाजोखा मांडला. संचलन शैलेशकुमार काकडे यांनी केले. आभार सरव्यवस्थापक नितीन उबाळे यांनी मानले.

परिसराला अध्यात्मिक वारसा-  संदीपदादा शेळके
 
महासिद्ध महाराज संस्थान, बेंबळे महाराज संस्थान, पळशी सुपो संस्थान, आवजी सिद्ध महाराज संस्थान, सखाराम महाराज संस्थानच्या माध्यमातून या परिसराला अध्यात्मिक वारसा लाभला आहे. पूर्णाकाठची जमीन काळी- कसदार आहे. इथला शेतकरी, युवक, माता- भगिनी यांच्यात प्रचंड क्षमता आहे. या क्षमतेला वाव देण्याची गरज आहे. राजर्षी शाहू मल्टिस्टेट, ग्रीन ऍग्रो बाझार यासाठी सज्ज असल्याचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी सांगितले.