बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक म्हणतात, भाजपचे उमेदवारी दिली तर लढणारच; भाईजींच्या चर्चेने महायुतीतील चुरस वाढली!

 
Chandak
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय! बुलडाणा अर्बनच्या रूपाने राज्याच्याच नव्हे देशाच्या सहकार क्षेत्रात एक 'आयडॉल' ठरलेले राधेश्याम चांडक यांनी भाजपकडून लढण्याचा इरादा जाहीर करून राजकीय क्षेत्रात आणि महायुती मध्ये एकच खळबळ उडवून दिली. "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना त्यांनी आज दिवसभर सुरू असलेल्या चर्चेला दुजोरा दिला आहे.
Add
                    Add. 👆
महायुतीमध्ये वादंगाचा विषय ठरलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील भाजपा व शिंदेगत राजकीय चर्चानी आज वेगवान वळण घेतले. पक्षीय उमेदवारांबरोबरच भाजपकडे बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्या रूपाने राखीव पर्याय असल्याची ही चर्चा वेगाने पसरली. यासंदर्भात विचारणा केली असता दस्तुरखुद्द चांडक यांनी याला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिल्याने ही चर्चा अफवा नव्हे तर वास्तव ठरली...
    
  निवडणूक आचारसंहितेचा मुहूर्त नजीक आल्यावरही बुलढाणा मतदारसंघातील जागा वाटप आणि उमेदवारीचा राजकीय तिढा कायम आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतरही हा तिढा कायम आहे. दुसरीकडे भाजपच्या मतदारसंघातील आढावा बैठकांचा धडाका कायम आहे. घाटावरील सहा तालुक्याच्या मेहकर येथील बैठकीत लोकसभा प्रमुख विजयराज शिंदेसह कार्यकर्त्यांनी बुलढाणा भाजपकडे घेण्याची जोरदार मागणी केली. त्यापूर्वी खासदार प्रतापराव जाधव यांच्या गृहक्षेत्रात भाजपकडून जंगी शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यामुळे भाजपा बुलढाण्यासाठी किती आग्रही आहे हे स्पष्ट झाले.
नेमके काय म्हणाले भाईजी...
दरम्यान सहकार क्षेत्रात बुलढाण्याचे नाव आशिया खंडात नेणारे राधेश्याम चांडक हे देखील बुलढाण्यातून लढण्यास तयार असल्याची चर्चा आज रंगली. यासंदर्भात थेट चांडक यांना विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. 'आपण भाजपकडे उमेदवारी मागणार नाही, पण पक्षाने उमेदवारी दिली तर नक्कीच लढणार ' असे चांडक यांनी बुलढाणा लाईव्हशी बोलताना सांगितले. भाजपचा विकासाचा मुद्दा लक्षात घेता आपण हा निर्णय घेतला आहे. मागील काळात आपण (एकसंघ) राष्ट्रवादी मध्ये कार्यरत होतो, पण मागील अनेक महिन्यापासून त्या पक्षा पक्षा पासून अंतरावर असल्याचे अर्थगर्भ उत्तरही त्यांनी दिले आहे.