शेळके दांपत्याकडून मूळगावी शिरुपुर येथे ''पुजाभिषेक"! जिल्ह्याच्या विकासाचे साकडे! म्हणाले, परमेश्वर आपल्या पाठीशी...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी मूळ गावी शिरपूर येथे भगवान शंकराची सपत्नीक पूजा केली. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकी मध्ये विजय मिळावा यासाठी प्रार्थना केली. वन बुलडाणा मिशनच्या अर्ज आशीर्वाद यात्रेतून शेळके यांचा उमेदवारी अर्ज जिल्ह्यातील धार्मिक स्थळी समर्पित केल्या जात आहे. उद्या ३ एप्रिलला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
आधी परिवर्तन रथयात्रा काढून संदीप शेळकेंनी जिल्हा पिंजून काढला. विकासाचे मुद्दे मांडून कॉर्नर सभा घेतल्या. यावेळी उत्स्फूर्त प्रतिसादाचा लाभ त्यांनी घेतला. यंदाची निवडणूक परिवर्तन घडवून आणणारी आहे. परिवर्तनाचा निश्चय जनतेने केला त्यामुळे विजय आपलाच आसा विश्वास शेळके यांनी व्यक्त केला. वन बुलडाणा मिशन या राजकीय चळवळीतून जिल्ह्याचा विकासासाठी लोकसभेच्या मैदानात उतरल्याचे शेळके यावेळी म्हणाले. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे असे संदीप शेळके यावेळी म्हणाले.