प्रा. नरेंद्र खेडेकर मोठ्या मताधिक्क्याने जिंकणार! पोहरादेवी गडाचे महंत सुनिल महाराज यांना विश्वास; समाज बांधवांनी मशालीला मतदान करण्याचे केले आवाहन
Apr 25, 2024, 10:06 IST
लोणार(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कोरोना कालावधीतील मानवतावादी दृष्टिकोनातून केलेले कार्य अतुलनीय आहे. राजधर्माचे पालन करून त्यांनी कुठलाही जातीभेद, पक्षपात न करता कोरोना महामारीच्या काळामध्ये संपूर्ण समाजाला कुटुंबासारखं सांभाळून घेत एकप्रकारे धर्मकार्यच केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो आहे आणि म्हणूनच बुलढाणा लोकसभा मतदार संघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडकर हे मोठ्या मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वास पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज यांनी लोणार येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला. उपस्थित समाज बांधवांना प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या मशाल या निशाणीवर शिक्का मारून मतदान करून त्यांच्या विजयामध्ये आपला वाटा उचला, असे आवाहन सुद्धा केले.
पोहरादेवी हे भारतातील महाराष्ट्र
राज्याच्या वाशीम जिल्ह्यातील एक गाव आहे. पोहरादेवी महाराष्ट्रातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्रांपैकी एक आहे. या ठिकाणी जगदुरू संत सेवालाल महाराज तसेच माता जगदंबा देवीचे भव्य मंदिर आहे. श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा भारतीय कृषीक्रांतीचे प्रवर्तक वसंतराव नाईक, जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांनीही भेटी दिलेली असून त्यांची समाधी पोहरादेवी पासून काही अंतरावर गहुली गड येथे आहे. तसेच पोहरादेवी येथे धर्मगुरू संत रामराव महाराजांची देखील समाधी आहे.
पोहरादेवी पासून पश्चिमेकडे उमरीगड हे संत सामकी मातेचे जागृत मंदिर असून बहुजनाचे मातृतिर्थ मानले जाते. या पवित्र गडाचे महंत २२ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरांमधील बंजारा तांडा येथे सेवालाल महाराजांचे वंशज व पोहरादेवी संस्थांनचे महंत सुनील महाराज यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले महाविकास आघाडीचे आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर हे तर शंभर टक्के निवडून येणारच आहे परंतु त्यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणायचे आहे व बंजारा समाज एक वचनी, स्वाभिमानी व विश्वासू समाज आहे बंजारा समाज हा एक गठ्ठा मतदान आपल्या आवडत्या उमेदवाराला करतो व ते संपूर्ण मतदान महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांना करण्याचे आवाहन यावेळी महंत सुनील महाराज यांनी केले. याप्रसंगी बुलढाणा लोकसभा समन्वयक राहुलजी चव्हाण प्रा. डॉ. गोपाल बशिरे, गजानन जाधव, सुदन अंभोरे यांचीही भाषणे झाली या सभेस प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, आम आदमी पक्ष यांचे पदाधिकारी दीपक मापारी, भरत राठोड, पुंजाराम जाधव, सतीश राठोड, परमेश्वर दहातोंडे, या श्रीकांत नागरे, राजू बुधवत, आश्रुवा धारकर, लुकमान कुरेशी, ऊमर सय्यद, इकबाल कुरेशी, जीवन घायाळ, श्रीकांत मादनकर, अमोल सुटे, गणेश सोलंकी, विशाल चव्हाण, अजय सुरुशे, सतीश साठे, गणेश पाठे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन भारत राठोड यांनी केले तर आभार सतीश राठोड यांनी मानले.