प्रतापराव जाधव ठरले शेतकऱ्यांचे संकटमोचक! संकटग्रस्त लाखो शेतकऱ्यांना मिळून दिला अब्जोवधीचा मदत निधी! ९ लाख शेतकऱ्यांना आपत्तीचे ७८९ कोटी वाटप; ६ लाख शेतकऱ्यांना पिकविम्याची ४१५ कोटींची दिली भरपाई
पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या नेतृत्वात देशातील सरकार नेहमीच बळीराजाच्या पाठीशी खंबीर उभी राहून विविध योजनांमधून शेतकरी हिताचे निर्णय घेत आले असून कुठल्याही संकटात शेतकरी कोणत्याही बाबतीत वंचित राहू नये याची काळजी घेतली आहे. यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना केवळ मानसिक धीर देण्याचेच नाही तर आर्थिकदृष्ट्या उभे राहण्यासाठी खा. प्रतापराव जाधव यांनी शासनाकडून नेहमीच अर्थ सहाय्य मिळवून दिले आहे. शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून उभे रहात त्यांच्याप्रती आपला जिव्हाळा व आपुलकी दर्शविली आहे. ही बोलकी आकडेवारी त्याचे सुस्पष्ट उदाहरण आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रतापराव जाधव हे खुद्द शेतकरी असून शेती कसतात. शेतकऱ्यांच्या व्यथेची जाण असल्याने आपला बळीराजा आनंदी राहावा, त्याच्यावर कोसळलेले संकट दूर करून मोठी आर्थिक मदत कशी मिळेल, यासाठी प्रतापराव जाधव यांनी वेळोवेळी सभागृहात आवाज उठविला. शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकिने मांडले. राज्य शासनाकडेही वेळोवेळी पाठपुरावा केला. त्याची दखल घेत शेतकऱ्यांना भरभरून नुकसान भरपाई देण्यात आली. या संकटामध्ये शासन वेळोवेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
अतिवृष्टी, सततचा पाऊस, महापूर, अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीमुळे या दोन वर्षात म्हणजे २०२२ व २०२३ मध्ये शेतकरी आर्थिक दृष्ट्या डबघाईस आला. जिल्ह्यातील ९ लाख २२ हजार ७४४ शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. ६,००,७२७.१८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांची हानी झाली. फळबागांचेही नुकसान झाले. या सर्व बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ७८९ कोटी ७१ लाख ४८ हजार रुपयांचा भरीव मदतनीधी शासनाकडून प्राप्त झाला. त्याचप्रमाणे पिकविमा हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आता राज्यसरकार द्वारा केवळ १ रुपयात पिकविमा योजना सुरु केली असून उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकार भरणार आहे. नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणांमुळे पिकांचे नुकसान होते, पिकांवर कीड व रोगराई पसरते. त्यामुळे उत्पादन व उत्पन्नात घट होते. त्या पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विमा योजना राबविण्यात येत आहे. त्या योजनांचा लाभ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी देखील खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. विमा कंपन्यांच्या बैठका घेऊन वेळप्रसंगी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची कान उघाडणी करून कंपन्यांना प्रतापराव जाधव यांनी वठणीवर आणले. कणखर बाणा दाखविताच कंपन्यांनी शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर केला.
शेतकऱ्यांनी भरले ८८ कोटी मिळाले ४१५ कोटी ...
गत चार वर्षात ११ लाख २७ हजार १२५ शेतकऱ्यांसाठी विमा काढण्यात आला. त्यातील ८८.९ कोटी रुपयांचा शेतकऱ्यांनी हिस्सा भरला. तर ५६१.९८ कोटी रुपये केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी ४९ टक्के याप्रमाणे वाटा भरला. त्यातील ६ लाख १६ हजार २३ बधीत शेतकऱ्यांना ४१५.३९ कोटी एवढा पिक विमा मिळवून देण्यात खासदार प्रतापराव जाधव यांनी यश मिळविले.