POLITICAL SPECIAL आमदार संजय गायकवाडांच्या लोकसभा निवडणुकीचे संकेत? वाचा कसे आहे समीकरण...

 
Sanjay
बुलडाणा(विजय देशमुख:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने संभाव्य उमेदवारांबाबत राजकीय वर्तूळात तसेच जनमानसातही आपआपल्या परीने अनुमान व्यक्त होत असतात.कोणत्या पक्षाकडून कोण असू शकतो उमेदवार ? याविषयीची तर्काधारित मांडणी करण्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेकांना रस असतो.काही इच्छूक उमेदवार हे सुप्तपणे मतदारसंघाचा कानोसा घेत राजकीय भविष्याची चाचपणी करण्याचा मुत्सद्दीपणा दाखवतात तर काही इच्छूक स्वतःच आपली उमेदवारी घोषित करून तयारीला लागलेले दिसत असतात.बुलडाणा लोकसभा मतदारसंघात मुख्यत्वे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा+शिवसेना(शिंदे गट)+ राष्ट्रवादी (अजित पवार गट)यांच्या उमेदवारांत लढत होण्याचे दृष्टिपथात आहे.तथापी वेळप्रसंगी दुरंगी वा तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही,असो. बुलडाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे धडाडीचे आमदार धर्मवीर/कर्मवीर संजय गायकवाड हे लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीसाठी एक आश्वासक चेहरा म्हणून समोर येण्याची चिन्हे दिसत आहेत.विधानसभा सोडून ते लोकसभेचा विचार करतील अशी कल्पनाही आतापर्यंत कुणी केली नसेल, पण संकेत मात्र तसेच मिळत आहेत.
Add
                          जाहिरात 👆
भाजपा+शिवसेना(शिंदे गट)+राष्ट्रवादी(अजित पवार गट) यांच्या युतीचे संभाव्य उमेदवार म्हणून आ.संजय गायकवाड यांच्या नावाचा विचार होणे ही एकूण परिस्थितीत काळाची गरज ठरू शकेल.आ.संजय गायकवाड यांची पाऊले लोकसभा उमेदवारीच्या वाटेने पडत आहेत याला पुष्टी देणा-या काही सुचक पोस्ट त्यांच्याच कार्यालयातून सोशल मीडियावर आल्या आहेत.आजमितीस बुलडाणा विधानसभा मतदारसंघ एवढेच कार्यक्षेत्र असलेल्या आ.गायकवाडांच्या पोस्टमध्ये" मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे सर्वसमावेशक व विकासात्मक नेतृत्व" तसेच "एकच ध्यास बुलढाणा जिल्हा" अशा जाणिवपूर्वक करण्यात आलेल्या उल्लेखातून हेच सुचित होते की,आ.गायकवाड हे राजकीय कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढवू इच्छित आहेत.आता लोकसभा कार्यक्षेत्र असाच त्याचा अर्थ ध्वनित होत आहे. या पोस्ट फ्रेममध्ये आ.गायकवाड यांच्या पाठिमागे मुख्यमंत्री शिंदे तर कोपऱ्यात बाळासाहेब ठाकरे व नरेंद्र मोदी यांचे फोटो आहेत. शिवाय विधानसभेचे सदस्य असलेल्या आमदार गायकवाडांच्या पाठीमागे संसदेचे चित्र आहे.
  जिल्ह्याचे वर्तमान खासदारपद हे शिवसेनेच्या शिंदे गटाकडेच आहे.राज्यात शिंदे गटाकडे १३ खासदार असून आगामी लोकसभेतही राज्यातून असे संख्याबळ कायम राखण्याचे आव्हान शिंदे गटापुढे आहेच. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींसाठी समर्थक खासदारांची एक-एक सीट महत्वाची असल्याने बुलडाणा लोकसभेसाठी विचारपूर्वक दमदार उमेदवार देणे हेच भाजपा व सहयोगी पक्षांचे अनिवार्य ध्येय असेल.हे पाहता या लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिविश्वासू व धडाडीचे आमदार संजय गायकवाड यांना लोकसभा निवडणूक मैदानात उतरवले जाईल असे चित्र दिसत आहे.मुख्यमंत्री शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या आ. गायकवाडांवर शिंदे यांचा मुक्त वरदहस्त आहे.बुलडाणा मतदार संघातील विविध विकासकामांचा धडाका पाहूनच हे सिध्द झाले आहे.आमदारकीच्या एकाच टर्ममध्ये झालेली अचाट कामे पाहून विरोधकही अवाक झालेले दिसत आहेत.बुलडाणा मतदारसंघात झालेली विकासकामे ही जिल्ह्यासाठी "रोल मॉडेल " ठरली आहेत.हाच धागा पकडून आ.गायकवाडांचे राजकीय कार्यक्षेत्र आता लोकसभा मतदारसंघाच्या रुपाने अधिक विस्तारेल असेच एकूण चित्र दिसत आहे.
  लोकसभेच्या निवडणूकीनंतर विधानसभा निवडणूक होईल.गायकवाड यांच्या विधानसभा मतदारसंघावर त्यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड दावा सांगू शकतील.आ.गायकवाड यांनी विविध विकास कामांबरोबरच सर्व धर्मीय व सर्व समाजाची प्रेरणा स्मारके विकसित केली आहेत ही त्यांची मोठी जमेची बाजू त्यांना लोकसभा उमेदवारीसाठी खुणावत आहे.बघू या.... घोडा मैदान समोर आहेच!