BIG BREAKING जिल्ह्यात राजकीय भूकंप! आमदार संजय गायकवाड लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत? आ.गायकवाड म्हणाले...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज भूकंपाचे धक्के बसत असताना बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड जोरदार भूकंप घडवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. असे असले तरी आ.गायकवाड यांच्याकडून याबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात येत असल्याचे समजते.
  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी मुंबईवरून शिंदेंच्या शिवसेनेचे निरीक्षक बुलडाणा लोकसभा मतदारसंघात आले होते. त्यावेळी आ. गायकवाडांच्या समर्थकांनी निरुक्षकांजवळ विद्यमान खासदारांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. काही महिन्याआधी स्वतः आ.संजय गायकवाड यांनी खा.जाधव भाजपच्या सर्वेत तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे म्हटले होते. त्याआधी आ.गायकवाड यांच्याकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत देणारे पोस्टर व्हायरल करण्यात आले होते. दरम्यान सध्या आ.संजय गायकवाड यांच्याकडून गोपनीय पद्धतीने जोरदार हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. आ.गायकवाड समर्थकांचा एक गट आपल्याला उमेदवारी अर्ज भरायचाच असा आग्रह धरत आहे तर काही समर्थक सबुरीने घ्यायचा सल्ला देत आहेत. 
  दरम्यान आज, २८ मार्चला साडेअकराच्या सुमारास तर १५ मिनिटांत आमदार गायकवाड अर्ज भरणार असल्याची चर्चा पसरली होती. यावर बुलडाणा लाइव्हने आ.गायकवाड यांचीशी संपर्क साधला असता "अजुन काही ठरले नाही" असे विविध प्रश्न निर्माण करणारे उत्तर त्यांनी दिले.