परिवर्तन रथयात्रा आज घेणार मोताळा तालुक्याचा निरोप! पंधरा तारखेपासून शेगाव तालुक्यात विकासाचा घोष अन परिवर्तनाचा जागर..

 
फवबज
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अल्पकाळातच जिल्ह्याचे 'उद्याचे नेतृत्व' ठरलेले वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली परिवर्तन रथयात्रा आज मोताळा तालुक्याचा निरोप घेणार आहे. राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारी आणि प्रचंड गाजलेली ही रथयात्रा १५ फेब्रुवारीपासून शेगाव तालुक्यात प्रवेश करणार आहे. दरम्यान आज मंगळवारी( दि 13) मोताळा तालुक्यातील येथे खरबडी समारोपीय सभा होणार असून ही सभा चांगलीच गाजणार आहे. 

१० फेब्रुवारीला मोताळा तालुक्यातील नळकुंड या आदिवासी बहुल गावातून यात्रेचा प्रारंभ झाला. पहिल्याच सभेत बोलताना या युवा नेत्याने जिल्ह्याच्या विकासाची तळमळ, व्हिजन व आक्रमकता याचे दर्शन घडविले. यामुळे शुभारंभ एकदम दणकेबाज झाला. आपल्या विकासाच्या संकल्पना मांडल्यावर त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांच्या दादागिरीचे जाहीर पोस्टमार्टेम' केले! मला जिल्ह्यातून गुंडाराज व कमिशनराज तडीपार करायचे असून त्यासाठी जनता जनार्दन व मतदारांची समर्थ साथ हवी असे आवाहन करीत त्यांनी नळकुंडच नव्हे तर संपूर्ण जिल्हाच दणाणून सोडला!

तुम्ही बदल घडवा, मी जिल्हा घडवितो...
१० फेब्रुवारीला नळकुंड येथून निघालेली ही सुसाट यात्रा उबाळखेड, रोहिणखेड, थळ, काळेगाव, फर्दापूर, वडगाव(ख), हनवतखेड, काबरखेड, चावर्दा, पोफळी, वाडी, रिधोरा या गावांत मजल दरमजल करीत पोहोचली. मुक्कामाचे ठिकाण असलेल्या धामणगाव बढे येथील सभा संदीप शेळकेंचे जंगी शक्ती प्रदर्शन ठरले. 
   तुम्ही बदल घडवा, मी जिल्हा घडवितो असा संदेश देत निघालेली ही यात्रा आज 13 ला बोराखेडी, परडा, शिरवा, तरोडा, पिंपळगाव नाथ, गिलोरी, जयपूर, आडविहिर , तिघ्रा, वरूड येथे जाणारी यात्रेची सांगता खरबडी होणार आहे.
बुधवारी विश्रांती,  गुरुवारी शेगावात...
 दरम्यान १२ फेब्रुवारी पासून सुसाट पळणारा परिवर्तन रथ १४ फेब्रुवारी ला विश्रांती घेणार आहे. यानंतर हा रथ गजानन महाराजांच्या वास्तव्याने पावन अश्या शेगाव तालुक्यात प्रवेश करणार आहे. चौदा तारखेच्या सुट्टीत शेगाव तालुक्यातील दौऱ्याचे नियोजन करण्यात येणार आहे.