खा.प्रतापराव जाधवांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे पंकजा मुंडे यांचे आवाहन! खा. जाधवांसाठी लवकरच घेणार प्रचारसभा; खा.जाधवांशी फोनवरून गप्पा! स्व. गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना दिला उजाळा

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.प्रतापराव जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी हे आवाहन केले. खा.प्रतापराव जाधव यांचे पुतणे योगेश जाधव यांनी काल, १२ एप्रिलला पंकजा मुंडे यांची भेट घेतली, यावेळी एका व्हिडिओ संदेशाद्वारे पंकजा मुंडे यांनी खा.प्रतापराव जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. लवकरच आपण खा.प्रतापराव जाधव यांच्यासाठी प्रचारसभेला येणार आहोत असेही त्या म्हणाल्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी खा. प्रतापराव जाधव यांच्याशी फोनवरून गप्पा मारल्या. प्रचार कसा सुरू आहे अशी विचारणा केली व स्व.गोपीनाथ मुंडे खा.जाधव यांच्या प्रचारासाठी यायचे त्या जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग बुलडाणा लोकसभा क्षेत्रात आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांचे देखील बुलडाणा जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या प्रचारासाठी स्व. गोपीनाथ मुंडेंनी घेतलेल्या सभा प्रचंड गाजलेल्या आहेत. दरम्यान काल खा.प्रतापराव जाधव यांचे पुतणे योगेश जाधव यांनी पंकजा मुंडे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे खा.प्रतापराव जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. खा.प्रतापराव जाधव यांना मत म्हणजे मला मत असे यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी खा.प्रतापराव जाधव यांना फोन करून प्रचार कसा सुरु आहे याबद्दल विचारणा केली. खा.प्रतापराव जाधव व पंकजा मुंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. खा.जाधव यांच्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी अनेकदा प्रचार सभा घेतल्या. प्रतापरावांना मत म्हणजे मला मत असे स्व.गोपीनाथ मुंडे म्हणायचे अशी आठवण खा.जाधव यांनी सांगितली. "तुमचा विजय निश्चित आहे, तुम्ही चौथ्यांदा संसदेत जाणार आहात.
मुंडे साहेबांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत." असे पंकजा मुंडे यावेळी खा.जाधव यांना म्हणाल्या. लवकरच खा.जाधव यांच्या प्रचारासाठी सभा घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या.