वन बुलढाणा मिशनच्या संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसादात शुभारंभ! संदीप शेळके म्हणाले, मागासलेला जिल्हा ही ओळख पुसून काढणार; एवढी उपलब्ध असताना जिल्हा मागासलेला कसा असु शकतो....

 
Bxbxn
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्याचा मागासलेला जिल्हा म्हणून उल्लेख केला जातो. त्यावेळी मनाला प्रचंड वेदना होतात. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधून मागासलेला जिल्हा ही ओळख कायमची पुसून काढणार, असा निर्धार राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी व्यक्त केला.
Bxnxn
वन बुलडाणा मिशनच्या जाहीरनामा जनतेचा संकल्पनेअंतर्गत १७ सप्टेंबर रोजी चिखली तालुक्यातील ईसोली येथून सायंकाळी संवाद यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, जिल्ह्यात गुणवंतांची कमी नाही. तरीही तरुणांना रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद, दिल्ली, बंगळुरुसारख्या महानगरात जावे लागते. शेतीसाठी मुबलक सिंचन व्यवस्था नाही. रस्ते, पाणी, वीज आदी सुविधांची वाणवा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाची दालनं कमी पडत आहेत. दर्जेदार क्रीडांगणे, क्रीडा सुविधा, आरोग्य सुविधा नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी गावातून पायदळ रॅली काढण्यात आली. रॅलीत महिला, पुरुष, युवक-युवती, ज्येष्ठ नागरीक यांचा सहभाग होता. महामानवांच्या पुतळ्यास हार अर्पण करुन संदीप शेळके यांनी अभिवादन केले. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. ग्रामस्थांनी सत्कार केला. संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 
जिल्ह्याला ऐतेहासिक, आध्यत्मिक वारसा
आपला बुलडाणा हा राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे. शेगावचे संत गजानन महाराज यांच्या रुपाने अध्यात्मिक वारसा लाभला आहे. लोणार येथील खाऱ्या पाण्याचे जागतिक सरोसर आपल्याच जिल्ह्यात आहे. विठ्ठलभक्त संत चोखामेळा हे आपल्या जिल्ह्याच्या मातीतील आहेत. थंड हवेचे ठिकाण म्हणून जिल्ह्या प्रसिद्ध आहे. एवढ्या सर्व उपलब्धी असतांना जिल्हा मागासलेला कसा असू शकतो? असा सवाल संदीप शेळके यांनी उपस्थित केला.