वन बुलढाणा मिशनचा नववर्षात संवाद मेळाव्यांचा धडाका! संदीप शेळकेंची तोफ धडाडणार; लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग; संदीप शेळके म्हणाले, विकास हेच ध्येय...

 

बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके नववर्षात जिल्हावासीयांशी संवाद साधणार आहेत. जाहीरनामा जनतेचा या कार्यक्रमांतर्गत १ ते ४ जानेवारी दरम्यान संवाद मेळावे आयोजित करण्यात आले आहे. याद्वारे संदीप शेळके जिल्ह्याच्या विकासात नागरिकांची मते जाणून घेणार आहेत. संवाद मेळाव्यांतून जिल्ह्यात पुन्हा एकदा त्यांची तोफ धडाडणार आहे. 

नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारीला शेगाव तालुक्यातील पहुरपूर्णा येथे सायंकाळी ६ वाजता सभा होणार आहे. २ जानेवारीला लोणार तालुक्यातील रायगाव, ३ जानेवारीला जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ आणि ४ जानेवारीला लोणार तालुक्यातील बीबी येथे संवाद मेळावा होणार आहे. सर्व ठिकाणच्या सभा सायंकाळी सहा वाजता होणार आहेत. 
 
बुलढाणा हा विविधतेने नटलेला जिल्हा आहे. नैसर्गिक समृद्धीची भरभरुन देण लाभलेली आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून बुलढाण्याची ओळख आहे. इथले वातावरण आरोग्याला पोषक आहे. फार गजबजपणा नाही. शांत, सरळ असा हा जिल्हा आहे. आता ही झाली एक बाजू. मात्र दुसरी बाजू अशी आहे की, बुलढाण्याला मागासलेला जिल्हा म्हटले जाते. प्रत्येक जिल्हावासियास यामुळे वेदना होतात. ही परिस्थिती बदलली पाहिजे, असे प्रत्येकाला वाटते. मात्र त्याकरिता सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे. 
शेळकेंच्या राजकीय उपक्रमांची जिल्हावासीयांना उत्सुकता
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतीम टप्प्यात आहे. केवळ तीन ते चार महिन्यांचा अवधी बाकी आहे. याचा अर्थ येणाऱ्या काळात संदीप शेळके विविध राजकीय उपक्रमांच्या माध्यमातून जनतेसमोर येतील एवढे मात्र नक्की. मात्र ते राजकीय उपक्रम नेमके कोणते? याची जिल्हावसीयांना उत्सुकता लागलेली आहे. कारण संदीप शेळके यांनी जिल्ह्याच्या राजकारणात नवीन ट्रेंड सेट केला आहे. जाहीरनामा जनतेचा, परिवर्तन पदयात्रा, संवाद मेळावे, पंढरपूर पायदळ वारी, शेतकरी, शेतमजूर मेळावा असे नवनवीन उपक्रम त्यांनी राववले आहेत. आता नवीन वर्षात ते नेमके कोणते राजकीय उपक्रम राबवणार, याची जिल्हावासीयांना औत्सुकता लागली आहे.  
विकास हाच ध्यास
वन बुलढाणा मिशन ही एक लोकचळवळ आहे. जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी ही चळवळ कार्य करणार आहे. मागासलेपण कसे दूर होईल? याकरिता काय करावे लागेल? तर उत्तर सरळ आहे की, जिल्ह्याचा विकास करावा लागेल. विकासाच्या योजना राबवाव्या लागतील. पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनीधींनी जसा त्यांच्या भागाचा चेहरामोहरा बदलला तसे कार्य करावे लागेल. विकास हेच ध्येय आणि ध्यास असल्याचे संदीप शेळके यांनी सांगितले.