वन बुलडाणा मिशनची बहुचर्चित "श्रीराम वंदना यात्रा" उद्या! सकाळी,६ वाजता मातृतीर्थ सिंदखेडराजातून होणार सुरुवात,रात्री ८ वाजता पोहचणार संतनगरी शेगावात!

इंडीयन आयडॉल फेम राहुल खरे करणार स्वरांची उधळण !
 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उद्या, २२ जानेवारी..हा भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस म्हणून उजाडणार आहे. अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यानिमित्ताने प्रभू श्रीरामांना वंदन करण्यासाठी संदीप शेळके यांच्या नेतृत्वातील वन बुलढाणा मिशन च्या वतीने बहुचर्चित "श्रीराम वंदना "यात्रा काढण्यात येत आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजा ते संतनगरी शेगाव अशी यात्रेची रूपरेषा असून सकाळी ५:४५ वाजता यात्रेला सुरुवात होणार आहे. रात्री८ वाजता संतनगरी शेगावात यात्रा दाखल होईल. यात्रेमध्ये इंडियन आयडॉल फेम राहुल खरे आकर्षण ठरतील.
वन बुलढाणा मिशन च्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांना प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा वासियांच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.. प्रभू श्रीराम मंदिर उत्सवामुळे संपूर्ण देशभरात भक्ती भावनेचे वातावरण तयार झाले आहे. जिल्हाभरातील राम भक्तांचा आनंद द्विगुणीत करण्याच्या हेतूने, तसेच समर्पित भाव ठेवून श्रीराम वंदना यात्रा काढण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्ह्याच्या मांगल्यासाठी प्रार्थना करणार असल्याचे वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके सांगतात.
या मार्गाने निघणार यात्रा..
 मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतून सुरू होणारी श्रीराम वंदना यात्रा किनगाव राजा, वीरपांग्रा, बिबी, मांडवा, मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा, लव्हाळा फाटा, मंगरूळ नवघरे, अमडापुर, उदयनगर, खामगाव मार्गे संतनगरी शेगावात दाखल होणार आहे. यात्रेदरम्यान गावोगावच्या मंदिरात पुजन होणार आहे. इंडीयन आयडॉल फेम सुप्रसिद्ध गायक राहुल खरे या यात्रेदरम्यान गीतरामायण तसेच राम भक्तीची गीते सादर करणार आहेत.