नव्या रेल्वेमार्गाच्या विषयावर खा. प्रतापराव जाधवांनी स्पष्टच सांगितलं! म्हणाले, हा केंद्राचा विषय, बुलडाणा - छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचा विषय माहीत नाही; त्यांना माहीत असेल म्हणाले...
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आज,२१ डिसेंबरला पत्रकार परिषद घेतली. आ. गायकवाड यांची पत्रकार म्हणजे टीआरपी खेचणारी..आजची पत्रकार परिषद देखील त्याला अपवाद नव्हती..खामगाव जालना रेल्वेमार्गाचा प्रश्न प्रलंबित असताना आ. संजय गायकवाड यांनी एका नव्या रेल्वेमार्गाचा विषय काढला. मलकापूर - बुलडाणा - छत्रपती संभाजीनगर अशा नव्या रेल्वेमार्गाची मागणी आ. गायकवाड यांनी केली. पुढच्या महिन्यात या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण होईल असा दावा आ.गायकवाड यांनी केला. एका यु- ट्यूब चॅनेलशी बोलतांना त्यांनी या नव्या रेल्वेमार्गाचा डीपीआर देखील बनायला सुरुवात झाल्याचा दावा केला, आपल्या सोर्सस च्या माध्यमातून ही मागणी केल्याचे आ.गायकवाड म्हणाले. खामगाव जालना रेल्वेमार्गाचा बुलडाणेकरांना जास्त फायदा नव्हता मात्र आता मलकापूर - बुलडाणा - छत्रपती संभाजीनगर या रेल्वेमार्गाच्या बुलडाणा वासियांना फायदा होईल असे ते म्हणाले..दरम्यान रेल्वेमार्गाचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने बुलडाणा लाइव्ह ने थेट खा. प्रतापराव जाधव यांना या नव्या रेल्वेमार्गाच्या विषयासंदर्भात विचारणा केली..