आषाढीनिमित्त वन बुलडाणा मिशनतर्फे जिल्हयातील २२ ठिकाणी फराळ वाटप! संदीप शेळकेंचे पांडुरंगाला साकडे, चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ दे..!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आषाढी एकादशीनिमित्त वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील २२ ठिकाणी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. संदीप शेळके यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
आषाढी एकादशीला मोठ्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. जिल्हयातील विठ्ठल -रुख्मिनी मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आषाढीला भाविक उपवास ठेवतात. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील २२ ठिकाणी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. चिखली, मोताळा, संग्रामपूर, जळगाव जामोद, पातुर्डा, वरवट बकाल, पिंपळगाव काळे, चांदुर बिस्वा, धामणगाव बढे, शेगाव, मेरा, देऊळगाव राजा, साखरखेर्डा, बीबी, सुलतानपूर, चांडोळ, जानेफळ, शेलापूर, खामगाव, लोणार, मेहकर, वैष्णवगड येथे फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुलडाण्यातील आराध्या लॉन्स येथे संदीपदादा शेळके, सौ. मालतीताई शेळके यांच्या हस्ते आरती करण्यात आली. भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ दे असे पांडुरंगाकडे साकडे घालण्यात आले.
वैष्णवगडावर पूजन, वाघजाळ संस्थानात आरतीचा मान 
सिंदखेडराजा तालुक्यातील वैष्णवगडावर दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यावर्षी सुद्धा आषाढीला भाविकांची गर्दी झाली होती. वैष्णवगडावर संदीप शेळके यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच उपस्थित भाविकांना फराळ देण्यात आला. वाघजाळ येथील विठ्ठल -रुख्मिनी मंदिर, बुलढाणा येथील आराध्या लॉन्स, चिखलीमधील पुंडलिक नगरातील विठ्ठल- रुख्मिनी मंदिरातही आरती करुन फराळ वाटप करण्यात आले.