बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये दाखल! बुलडाणा तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने म्हणाले, आम्ही शरद पवार साहेबांशी एकनिष्ठ!

जिल्ह्यातील सगळे तालुकाध्यक्ष शरद पवारांसोबत...
 
Fgh
बुलडाणा(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आज ५ जुलैला दोन्ही गटांची मुंबईत बैठक होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या बैठकीसाठी मुंबईत पोहचले आहेत.
शरद पवार गटाची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये होत आहे तर अजित पवार गटाची बैठक एमइटीम इन्स्टिट्यूट मध्ये होत आहे. वृत्त लिहितेवेळी अजित पवार गटाच्या बैठीकीत ३१ तर शरद पवार गटाच्या बैठकीत १७ आमदारांनी हजेरी लावलेली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पोहचले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्याशी संपर्क होऊ शकला नसला तरी ते सुद्धा यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये शरद पवार गटाच्या बैठकीला पोहचल्याचे समझते. बुलडाणा तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने हे सुद्धा मुंबईत दाखल झाले आहेत. तासाभरापूर्वीच ते यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पोहचले आहेत .
      बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच आजी तालुकाध्यक्ष हे शरद पवार यांच्यासोबत आहेत, अशी माहिती दत्तात्रय लहाने यांनी बुलडाणा लाइव्ह ला दिली. आम्ही शरद पवारांशी एकनिष्ठ आहोत, शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस असे दत्तात्रय लहाने म्हणाले.