Amazon Ad

अबकी बार ४०० पार चा निर्धार पूर्ण करण्यासाठी खा.प्रतापराव जाधव यांना विजयी करा! भाजप नेते योगेंद्र गोडेंचे आवाहन; मोताळा तालुक्यात पायाला भिंगरी लावून प्रचार; गावागावांत घेतल्या बैठका

 
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल महासत्तेच्या दिशेने होत आहे. संपूर्ण जगाला भारताचा हेवा वाटत आहे. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर आहे. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, अल्पसंख्यांक, महिला या समाजातील सर्वच घटकांच्या उन्नतीचा विचार करणारे केंद्र सरकार आहे. ज्या गोष्टी होतील असे स्वप्नातही वाटत नव्हते त्या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवल्या. त्यामुळे देशाचा विश्वास हा मोदींवरच आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पार चा निर्धार यशस्वी करण्यासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून त्यात भागीदारी असली पाहिजे म्हणून खा.प्रतापराव जाधव यांना रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करा असे आवाहन भाजप नेते योगेंद्र गोडे यांनी केले. गेल्या दोन दिवसांपासून योगेंद्र गोडे खा.प्रतापराव जाधव यांच्यासाठी मोताळा तालुक्यात पायाला भिंगरी लावून प्रचार करीत आहेत, गावागावांत बैठका, कॉर्नर सभांना संबोधित करीत आहेत.
 मोताळा तालुक्यातील पुन्हई,सारोळापीर,पोफळी,टाळी घडेकर,कोल्ही गवळी,उर्हा,दहिगाव,लिहा या गावांमध्ये योगेंद्र गोडे यांनी बैठका घेतल्या. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना मत म्हणजे मोदींना मत असे म्हणत त्यांनी खा.जाधव यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हा सरचिटणीस यशवंतराव पाटील,भाजपा जेष्ठनेते निनाजी घनोकार,भाजपा तालुकाध्यक्ष गजानन घोंगडे,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रवीण जवरे,भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रभंजय पाटील,भाजपा शहराध्यक्ष राजेश आढाव,माजी उपसरपंच विशाल व्यवहारे,शालीकराम सुरडकर,रामेश्वर काळंगे,प्रताप देशमुख, सुनील लवंगे,सचिन व्यवहारे,सुनील अवचार, श्रीकृष्ण सूरडकर,वासुदेव शिंदे, रामभाऊ शिंदे,धीरज राजपूत,नितीन अग्रवाल,सागर पवार,सुपडा पाटील,डॉ.वैभव इंगळे,सुनील वाघ,मुकुंदा पाटील,शांताराम पाटील,आनंदा महाराज शेळके,सुरेश सराग,प्रमोद शेळके,विलास कोलते,मंगेश क्षीरसागर, सुरेश तायडे, धंनजय चोपडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.