अब आयेगा मजा! शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी ३८ रिंगणात! ६९ जणांनी घेतली माघार

 
bajar samiti shegaon

शेगाव ( ज्ञानेश्वर ताकोते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एप्रिलच्या मध्यावर उन्हाचा पारा चाळिशीच्या पुढे सरकत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीमूळे जिल्हाभर राजकीय आखाडा चांगलाचा तापला आहे. त्यातही आज उमेदवारांचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, साडेतीन वाजेपर्यंत ६९ उमेदवारांनी पॅनलची हिरवी झेंडी न मिळाल्यामुळे आपापले अर्ज परत घेतले. त्यामुळे आता शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात आहेत.

gode

                                                                                                      ( जाहिरात )

 निवडणूक अधिकारी बी. एन .कोल्हे यांनी उमेदवारांची अंतिम यादी स जाहीर केली आहे. पक्षचिन्हाशिवाय होत असलेल्या या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणूकीत कोण कोणाचा बाजार उठविणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे . 

इच्छूकांची भाऊगर्दी हाताबाहेर गेली होती, मात्र सहकार क्षेत्रातील या दिग्गज नेत्यांनी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आपापला मास्टर स्ट्रोक टाकल्याने भाऊ गर्दी केलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.  काहींनी बंडखोरी करत दुसऱ्या पॅनल कडून उमेदवारी मिळवली. दोन दिवसांपूर्वी ऐन वेळेवर वंचित ने मात्र भाजप प्रणित शेतकरी पॅनल सोबत आपली युती करत मास्टर स्ट्रोक टाकला. दुसरीकडे राष्ट्रवादीतील एका गटातील माजी तालुकाध्यक्ष यांनी आपल्या भावाच्या पत्नीसाठी शेतकरी पॅनल कडून उमेदवारी मिळवली. शेगाव तालुक्यात राष्ट्रवादी व काँग्रेसची ताकद कमीअधिक आहे, तरीही मागील ३५  वर्षापासून शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व स्थापित करणारे सहकार नेते पांडुरंग  पाटील यांचे सह काँग्रेस नेते श्री ज्ञानेश्वर पाटील यांनी आपली संपूर्ण ताकद या निवडणुकीत लावल्याचे दिसून येत आहे.  ठाकरे गट मात्र जेमतेम असून ठाकरे गटातील एका उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे. 
तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षासोबत  राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष यांचा एक गट, वंचित बहुजन आघाडी व शिंदे गट यांनी संयुक्तपणे शेतकरी विकास आघाडी पॅनलची घोषणा केली आहे. मागच्या निवडणूकीत भाजपा नेतृत्वाने "तन-मन व धन" ओतून बाजार समितीची निवडणूक गनिमी काव्याने लढवून परिवर्तन घडवून आणले होते. मात्र परिवर्तनाची नांदी फार काळ टिकली नव्हती. त्यामुळे कदाचित परिवर्तन पॅनलचे नाव शेतकरी विकास पॅनल ठेवून आ. डॉ. संजय कुटे व आ. आकाश फुंडकर यांच्या सहकार्याने भाजपाच्या नेत्यांनी यावेळी पुन्हा निवडणूकीला सामोरे जाण्याचा चंग बांधलेला दिसून येतोय .