आता बुलडाणा शहरातल्या "त्या" टॉवरवर चढणार! वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांचा इशारा! म्हणाले, झोपलेल्या शासनाला जाग करायचंय...

केंद्र आणि राज्य सरकार झोपलेले सरकार आहे. देशात दंगली भडकवायच्या, धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि त्यातून मतांचे धुर्वीकरण करायचे हेच एकमेव काम केंद्र आणि राज्य सरकार करीत आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांशी सरकारला कोणतेही देणे घेणे नाही.बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते आहे सुशिक्षित तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना वाढत आहेत मात्र सरकार त्यावर काहीही उपाययोजना करीत नाही असा आरोप सतीश पवार यांनी केलाय. राज्यातल्या स्पर्धा परीक्षा घेण्याचे कंत्राट खाजगी कंपनीला देऊन आर्थिक हितसंबंध जोपासण्याचे काम सरकार करीत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परीक्षा पद्धतीमध्ये घोटाळे होत आहेत पेपर फुटी होत आहे असे सतीश पवार म्हणाले.
त्यामुळे या परीक्षा घेण्याचे अधिकारही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्यात यावेत, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन आकारलेली अवाजवी शुल्क माफ करण्यात यावे तसेच त्यांना स्थानिक किंवा त्यांच्या पसंती क्रमाने परीक्षा केंद्र देण्यात यावेत या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २८ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून असलेल्या बीएसएनएल टॉवर वर चढून आंदोलन करणार असल्याचे सतिश पवार यांनी घोषित केले आहे. पवार यांच्या घोषणेमुळे पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे.