मलकापूर बाजार समिती सभापती विरोधात अविश्वास प्रस्ताव! १४ संचालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मलकापूर बाजार समितीच्या सभापती विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. १७ संचालकांपैकी १४ संचालकांनी काल २१ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना अविश्वासाचे पत्र सादर केले. संचालकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मलकापुरात एकच खळबळ उडाली आहे. 
  २८ एप्रिल २०२३ रोजी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली. त्यात भाजपप्रणीत पॅनल ने एकतर्फी विजय मिळवला. २० मे रोजी बाजार समितीच्या सभापतीपदी शिवचंद्र तायडे तर उपाससभापती पदी नागोजी राणे यांची निवड करण्यात आली. गत वर्षभरापासून सुरळीत कारभार सुरू असतानाच हा ट्विष्ठ निर्माण झाला आहे. निवडणुकीनंतर हमाल मापारी मतदारसंघाचे संचालक अब्दुल सलीम अब्दुल मुनीर यांचे निधन झाले होते. त्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळावर सभापती, उपसभापतीसह १७ जणांचे संचालक मंडळ कार्यरत आहे. २० मे रोजी सत्ता स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी सभापती बदलाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. २१ मे रोजी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी १८ जणांनी विद्यमान सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला. त्यावर उपसभापती नागोजी राणे, संचालक साहेबराव पाटील, श्रीकृष्ण खापोटे, विजय साठे, भगवान चोपडे, सुभाषराव पाटील, नंदा पाटील, प्रीती नारखेडे, मधुकर फासे, संजय काजळे, ज्ञानदेव वाघोदे, सुनील अग्रवाल, कुंदन चांडक, प्रवीण पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.