ना कुठला पक्ष, ना राजकीय गॉडफादर...तरीही संदीप शेळकेंना हे कसं जमतंय? काय आहे संदीप शेळकेंच वेगळेपण? जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा तर होणारच ना....

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संदीप शेळके....जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अलीकडच्या ५ -६ महिन्यांत या नावाची खुप चर्चा आहे.. खरं तर कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही..राजकीय पक्ष नाही..त्यामुळे गॉडफादर चा विषयच नाही...एवढी अनुउपलब्धता असताना देखील राजकीय वर्तुळात जर चर्चा होत असेल तर काहीतरी खास असेलच ना......हो..जी गोष्ट संदीप शेळकेंना खास बनवते ती आहे त्यांचं "व्हिजन"...! लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केल्यानंतर संदीप शेळकेंना आता भरभरून पाठिंबा मिळतोय..दोन दिवसांपूर्वी बुलडाण्यात झालेला वन बुलडाणा मिशनचा बूथ कमिटी सदस्यांचा मेळावा तर अभूतपूर्व असाच ठरला..जवळपास जिल्ह्यातल्या प्रत्येक बूथ वरील सदस्यांचे प्रतिनिधित्व या मेळाव्यात सहभागी झाले..त्याआधी झालेला बूथ बांधणी मेळावाही दणकेबाज असाच झाला होता..२२ जानेवारीला श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त निघालेली "श्रीराम वंदना यात्रा" वेगळा माहौल तयार करून गेली..याशिवाय जिल्ह्यातल्या विविध गावांत झालेल्या संवाद सभाही संदीप शेळकेंनी चांगल्याच गाजवल्या..आता १० फेब्रुवारीपासून संदीप शेळकेंनी परिवर्तन रथयात्रा काढण्याची घोषणा केली आहे..जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात जायचा त्यांचा प्लॅन आहे....खर तर लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना इतर संभाव्य उमेदवारांच्या तुलनेत तयारीच्या बाबतीत संदीप शेळके खुपच वेगाने पुढे निघून गेल्याचं जाणकार राजकीय विश्लेषकांच मत आहे.. त्यामुळं राजकारणात नवख्या असलेल्या संदीप शेळकेंना हे कसं जमतंय अशी चर्चा होणंही स्वाभाविक आहे..
बुलडाणा
"वन बुलडाणा मिशन" ही राजकीय लोकचळवळ सुरू केल्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये जनतेचा जाहीरनामा असा आगळावेगळा कार्यक्रम संदीप शेळके यांनी घेतला. सिनेअभिनेते भारत गणेशपुरे यांनी संदीप शेळकेंची मुलाखत घेतली. याच मुलाखतीत आपल व्हिजन काय असेल हे संदीप शेळके यांनी सांगितलं आणि लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणाही केली. राजकारणात यायचं तर व्हिजन घेऊन हे संदीप शेळकेंच वेगळेपण लोकांना जाम भारी वाटल..जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी "वन बुलडाणा मिशन" असा नारा संदीप शेळके यांनी दिला..त्यानंतर मात्र संदीप शेळके थांबले नाहीत..!
Hdhd
  जिल्हाभर संवाद यात्रा...
लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली तेव्हा तुमचा पक्ष कोणता असेल? अशी विचारणा पत्रकारांनी केली तेव्हा जनता हाच आपला पक्ष असे सांगत संदीप शेळके यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. जिल्हाभरात विविध ठिकाणी जाहीरनामा जनतेचा या अभियानाअंतर्गत संवाद सभा घेतला. या सभांमधून जिल्ह्याच्या विकासाच व्हिजन संदीप शेळके मांडत राहिले. हे करतांना संदीप शेळके यांनी कुणावर आरोप प्रत्यारोप केले नाहीत, खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत..कुणी काय केलं नाही याचं भांडवल केल्यापेक्षा आम्ही काय करणार हे सांगण्यावर त्यांनी भर दिला..आरोप, प्रत्यारोप आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करण्याच्या आजच्या काळात संदीप शेळके यांचं वेगळेपण लोकांच्याही लक्षात आलं, त्याचा परिणाम आज संदीप शेळकेंना मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्यातून दिसून येतोय..
Hxhx
  
  विकासाचे राजकारण अन् व्हिजन हे वेगळेपण...
  तुमचा हेतू प्रामाणिक आणि काम करण्याची तळमळ लोकांना दिसली की लोक तुम्हाला डोक्यावर घेतात..भलेही मग तुमचा पक्ष कोणताही असो वा नसो..संदीप शेळकेंच्या बाबतीतही हेच होतांना दिसतय..शेळके जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा जिल्ह्याच्या विकासाशिवाय त्यांच्या बोलण्यात दुसरं काही नसत.. जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न कसा सोडवता येईल, पर्यटन समृध्द करून रोजगार कसा वाढवता येईल..बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला मार्केट कसे उपलब्ध करून देता येईल..जिल्ह्यात उद्योगधंदे कसे वाढवता येतील या विषयावरचा थेट कृती आराखडा संदीप शेळके यांच्याजवळ तयार आहे..पारंपारिक राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण करण्याची संदीप शेळके यांची स्टाईल लोकांना आवडू लागली आहे..कोणताही पक्ष, गॉडफादर, राजकीय पार्श्वभूमी नसताना संदीप शेळके यांच्या कार्यक्रमांना, सभांना होणारी गर्दी राजकीय परिवर्तनाचे तर संकेत देत नाही ना..?