BIG BREAKING बुलडाणा शहर पोलिस ठाण्यासमोर रविकांत तुपकरांचे समर्थक नितीन राजपुतांनी केला आत्महत्येचा प्रयत्न! झाडावर चढून गळफास घेणार तेवढ्यात; पहा व्हिडिओ....

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आज बुलडाणा शहर पोलिसांनी अटक केली. तुपकर यांनी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी २० नोव्हेंबरला बुलडाण्यात एल्गार महामोर्चा काढला होता. या महामोर्चात तुपकर यांनी सरकारला ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मागण्या मान्य केल्या नाही तर २९ नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेऊ असा इशारा तुपकर यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर तुपकर यांना आज पोलिसांनी अटक केली. सध्या त्यांना बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले आहे. पोलिस ठाण्यासमोर तुपकर यांच्या समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान रविकांत तुपकर यांचे समर्थक असलेल्या नितीन राजपूत यांनी तुपकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ पोलीस ठाण्यासमोरच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
बुलडाणा शहर पोलिस स्टेशनसमोर असणाऱ्या झाडावर चढून नितीन राजपूत गळफास घेऊन आत्महत्या करणार होते, मात्र तेवढ्यात शहर पोलिसांच्या पथकाने राजपूत यांना आवरल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या बुलडाणा शहर पोलिस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण आहे. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावमही येथे एक शेतकरी आत्महत्या करण्यासाठी टॉवर वर चढला होता...