निर्धार परिवर्तन अभियानाला चिखली तालुक्यात सुरुवात! तुपकरांचे समर्थक थेट बांधावर जावून साधताय शेतकऱ्यांशी संवाद..

 
kdsjdlkj

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा:( ऋषी भोपळे )   लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे निर्धार  परिवर्तन अभियान सुरू आहे. या अभियानाला आज ७ मार्च रोजी  चिखली तालुक्यात सुरुवात झाली. दरम्यान  कार्यकर्ते, पदाधिकारी व तुपकर समर्थक  गावोगावी जावून थेट जनतेशी  संवाद साधत आहेत.

सद्या शेतीचे कामे सुरु असल्याने शेतकरी कामात गुंतले आहेत. त्यामुळे बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे. शेतक-यांच्या अडीअडचणी समजवून घेत घरोघरी कार्यकर्ते पोहचले आहेत.  या अभियानाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनतेचे रविकांत तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांवरील प्रेम व विश्वास यानिमित्ताने पुन्हा एकदा पहायला मिळत असल्याचे पदाधिकारी सांगतात.