शेगाव तालुक्यातील जवळा बु. गावात आज रविकांत तुपकर यांची जाहीर सभा!

 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)आज ३ जानेवारीला शेगाव तालुक्यातील जवळा बु. गावात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची जाहीर सभा होणार आहे. शेतकरी, कष्टकरी, मजूर व तरुणांचा परिवर्तन तथा एल्गार मेळावा या कार्यक्रमा निमित्ताने तुपकर जवळा बु. गावात येणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. स्वाभिमानीचे जिल्हा संपर्कप्रमुख श्याम अवथळे यांच्यासह ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
  धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा तुपकर यांनी छेडला आहे. आज तुपकर यांची तोफ जवळा बु गावात धडाडणार आहे. शेतकरी, कष्टकरी मजूर व तरुणांच्या न्याय हक्कासाठी, नुकसान भरपाई मिळवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभेची निवडणुक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांच्या भाषणाकडे राजकीय दृष्ट्याही लक्ष लागून आहे.