खरा शिवसैनिक कसा असतो, नरूभाऊंनी दाखवून दिलं! डोणगाव रोडवर अपघात झाला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला स्वतःच्या गाडीत टाकून पोहचवंल दवाखान्यात, तरुणाचा वाचवला जीव! म्हणाले, प्रचार नंतर होईल..

 
Hjjb
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण..! हि हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब      ठाकरे यांची शिकवण..बाळासाहेबांचा हाच विचार घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेना पोहोचली.. सत्तेसाठी राजकारण नव्हे तर समाजासाठी राजकारण या तत्त्वावर शिवसेना वाढत गेली.. अडल्या नडलेल्यांना मदत करायची, जिथे गरिबांवर अन्याय होत असेल तिथे अन्याय करणाऱ्यांना "शिवसेना स्टाईल" चोप द्यायचा..हीच शिवसेनेची कार्यपद्धती..ही कार्यपद्धती प्रत्यक्ष कृतीरूप जगणारा शिवसैनिक म्हणुन नरेंद्र खेडेकरांची ओळख.. मनाने कठोर पण सामान्यांच्या वेदना पाहून प्रसंगी हळवा होणारा खेडेकरांचा स्वभाव... खेडेकरांच्या या स्वभावाचे दर्शन घडलं ते काल १३ एप्रिलला..अर्थात त्याला कारणही तसंच होत..नरेंद्र खेडकरांचा काल, मेहकर तालुक्यात प्रचार दौरा होता.. सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतलेल्या खेडेकरांना मेहकर तालुक्यातही दमदार प्रतिसाद मिळाला..नरेंद्र खेडेकर उकळी सुकळी येथे जात  असताना मेहकर डोणगाव रोडवर मेहकर पासून ३ किमी अंतरावर एका तरुणाचा भीषण अपघात झालेला होता..तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता..रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची गर्दी, काही जण फोटो काढत होते तर काही जण रुग्णवाहिकेशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते..मात्र कशाला रिकामे चौकशीचे झंझट म्हणून मदतीसाठी कुणी धावून येत नव्हत...हे पाहून खेडेकरांच्या रक्तातला शिवसैनिक जागा झाला अन् ते मदतीसाठी सरसावले...

  तिकडे आधीच उकळी - सुकळी गावात प्रचंड मोठा जनसमुदाय खेडेकरांची वाट पाहत होता..मात्र प्रचारापेक्षा खेडेकरांनी महत्व दिले ते शिवसैनिक या बिरुदावलीच्या कर्तव्याला..आपल्याला प्रचाराला आधीच उशीर झालाय, आणखी उशीर होईल असा विचारही खेडेकरांच्या मनात आला नाही. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अपघातग्रस्त तरुणाला स्वतःच्या गाडीत टाकले..

आणि तात्काळ मेहकर शहरातील गाभणे हॉस्पिटल गाठले.. डॉक्टरांना सविस्तर माहिती दिली, तरुणाच्या उपचाराची व्यवस्था केली आणि तरुण शुध्दीवर आल्यावरच पुढचा प्रवास केला. तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे आता तरुणाची प्रकृती धोक्याबाहेर असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे  डॉक्टरांनी सांगितले..दरम्यान अपघातग्रस्त तरुणांच्या कुटुंबीयांनी नरेंद्र खेडेकरांच्या रूपाने आम्हाला देवमाणूस भेटला अशा भावना व्यक्त केल्या.