उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेंद्र खेडेकरांची पहिली प्रतिक्रिया बुलडाणा लाइव्हवर.!म्हणाले... उद्धवजींचा विश्वास सार्थ ठरवू, गद्दारांना गाडून दाखवू.

 
नंदन

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून उबाठा शिवसेनेच्या वतीने प्रा. नरेंद्र खेडेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज,२७ मार्चच्या मुहूर्तावर उबाठा शिवसेनेने राज्यातील १७ उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यात पहिल्या क्रमांकावर नरेंद्र खेडेकरांचे नाव आहे. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेंद्र खेडेकर यांनी बुलडाणा लाइव्हला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धवजींचा विश्वास सार्थ ठरवू, गद्दारांना गाडून दाखवू अशा शब्दात नरेंद्र खेडेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  बुलडाणा लाइव्हशी बोलतांना नरेंद्र खेडेकर म्हणाले की, बुलडाणा लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. गद्दार खासदारांनी गद्दार केली असली तरी शिवसेनेचा मतदार प्रामाणिक आहे. बुलडाण्याचे मतदार गद्दारी पसंत करत नाहीत हा इतिहास आहे. त्यामुळे यावेळेला पुन्हा एकदा उद्घवजींच्या नेतृत्वातील शिवसेनेचा भगवा या मतदारसंघावर फडकणार आहे. मला उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल उद्धवजींचे मनापासून आभार. त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असे नरेंद्र खेडेकर "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना म्हणाले.