Amazon Ad

"...यामुळे" नरेंद्र खेडेकरांचा विजय होणारच ! जयश्रीताई शेळकेंचे प्रतिपादन! बुलडाणा तालुक्यात खेडेकरांच्या प्रचार सभांना उस्फुर्त प्रतिसाद! नरेंद्र खेडेकरांचा आज मेहकर तालुक्यात प्रचार दौरा..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून नरेंद्र खेडेकरांनी गाजवलेली कारकीर्द आजही जिल्हावासियांना माहीत आहे. नरेंद्र खेडेकर हे उच्चविद्याविभूषित आणि विकासाची पारख असलेले नेतृत्व आहे. कुठल्याही संकटांना निधड्या छातीने सामोरे जाणारा हा शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे. बुलडाण्याच्या मातीत गद्दारीची बीजे कधीच अंकुरली नाहीत, ही माती निष्ठावान माणसांवर प्रेम करणारी माती आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर विजयी होणारच आहे असे प्रतिपादन काँगेसनेत्या जयश्रीताई शेळके यांनी केले.  नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ बुलडाणा तालुक्यात आयोजित विविध प्रचार सभांना संबोधित करताना त्या बोलत होत्या.नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचार सभांना बुलढाणा तालुक्यातील प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष खेडेकरांच्या प्रचार अर्थ जोमाने भिडले आहेत.

  महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर हे प्रचारासाठी गाव भेटीबरोबरच प्रचार रॅलीवर भर देत असून त्यांच्या प्रचार फेरीला गावात गावकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. या रॅलीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी दिसत असून नरेंद्र खेडेकर हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत आहे. काल, १२ एप्रिल रोजी बुलडाणा तालुक्यातील बिरसिंगपुर, देऊळघाट, उमाळा, दत्तपुर, नागो, गिरडा या गावात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नरेंद्र खेडकर यांच्या प्रचार फेरीचे आयोजन केले होते.या रॅलीद्वारे जनतेला मशाल या निशाणी समोरील बटन दाबून नरेंद्र खेडकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केले. यावेळी महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. 

आज नरेंद्र खेडेकरांचा मेहकर तालुक्यातील प्रचार दौरा..

प्रा. नरेंद्र खेडेकरांचा प्रचार दौरा आज १३ एप्रिल रोजी मेहकर तालुक्यात आहे. लव्हाळा, हिवरा आश्रम, दे. माळी, कल्याणा, नायगाव/शेंदला, जानेफळ, वरवंड, दे. साकर्शा, घाटबोरी, विश्र्वि, शेलगाव देशमुख, डोणगाव, अंजनी, उकळी सुकळी या गावांमध्ये नरेंद्र खेडेकर प्रचारासाठी पोहचणार आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खेडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.