नरेंद्र खेडेकरांनी नामांकन अर्ज भरला! म्हणून घेतली "ही" खबरदारी...
Updated: Apr 4, 2024, 13:44 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी आज ४ एप्रिलच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला. आधी सभा नंतर अर्ज दाखल करणे असा पूर्वनियोजित कार्यक्रम असताना त्यात बदल करून प्रा. खेडेकरांनी आधी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने आणि त्यासाठी दुपारी तीन वाजे पर्यंतची डेडलाईन असल्याने वेळेवर गडबड होऊ नये म्हणून प्रा. खेडेकरांनी ही खबरदारी घेतली.
Advt. 👆
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, थोड्याच वेळात होणाऱ्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शिवसेनेच्या स्टार प्रचारक सुषमा अंधारे, काँग्रेस नेत्या जयश्री शेळके, आ.राजेश एकडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना खेडेकरांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला बुलडाणा जिल्ह्याच्या मातीत गद्दारांना घडले जाईल असे ते म्हणाले.