नाना पटोले पोरकट, मानसिक रोगी; त्यांची जीभच नव्हे तर अक्कलही घसरलेली!; आमदार सौ. श्वेताताई महालेंची टीका
Updated: Jan 24, 2022, 19:26 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पोरकट आहेत. त्यांची जीभच नाही तर अक्कल सुद्धा घसरलेली आहे. त्यामुळे त्यांनी उच्च दर्जाच्या मानसिक रोग तज्ज्ञाकडून स्वतःच उपचार घ्यावा. खर्च वाटल्यास भाजपा करेल, अशी घणाघाती टीका भाजपा आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केली आहे. आज, २४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही विधाने करून राज्यात खळबळ उडवून दिली आहे.
पहा व्हिडिओ ः
मी मोदींना मारू शकतो. शिव्याही देऊ शकतो, असे विधान नाना पटोले यांनी केले होते. विशेष म्हणजे बुलडाण्यात काँग्रेसने पटोलेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती तर जिल्हाभर भाजप कार्यकर्त्यांनी पटोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पटोले यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले.
ज्यांची बायको सोडून गेली, त्यांना लोक मोदी म्हणतात, असे पटोले म्हटले होते. त्यावर बोलताना आ. सौ. महाले पाटील म्हणाल्या, की काँग्रेसमध्ये अकलेचा दुष्काळ पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वेषाने पछाडलेल्या काँग्रेसचा जनाधार गळून पडला आहे. नाना पटोले यांनी त्याकडे लक्ष द्यावे. बेताल वक्तव्यामुळे त्यांचा जनाधार कमी होत आहे, असेही त्या म्हणाल्या.