ना.प्रतापराव जाधवांची संवेदनशीलता! सत्काराचा कार्यक्रम बाजुला ठेवून वादळग्रस्त देऊळगाव घुबेला भेट; मृतक सईच्या कुटुंबासाठी ४ लाखांचा धनादेश दिला..

 
चिखली
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी आज चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे भेट दिली. तीन दिवसांआधी देऊळगाव घुबे येथे वादळाने थैमान घातले होते. सई साखरे नावाची ६ महिन्यांची चिमुकली झोक्यासह उडून गेली होती, त्या दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान आज जिल्ह्यात आल्यानंतर ना.प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम बाजूला ठेवून आधी देऊळगाव घुबे गाठले. वादळाने नुकसान झालेल्या ग्रामस्थांना त्यांनी धीर दिला. मृतक सई साखरेच्या कुटुंबियांना ना .जाधव यांच्याहस्ते ४ लाख रुपयांच्या शासकीय मदतीचा धनादेश देण्यात आला.
  केंद्र आणि राज्य सरकार आपल्यासोबत आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळेल असा शब्द यावेळी ना.प्रतापराव जाधव यांनी दिला. यावेळी त्यांच्यासोबत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित झाले.