चिखलीचे राजकारण पेटणार? श्याम वाकदकर मारहाण प्रकरणी आ. श्वेताताई महाले घेणार पत्रकार परिषद! बुलडाणा लाइव्ह वर पहा थेट प्रक्षेपण..

 
rahulbondre and sweta mahale
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी भाजप कार्यकर्ते श्याम वाकदकर यांना मारहाण केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. राहुल बोंद्रे यांच्यासह त्यांच्या ५  साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. सध्या राहुल बोंद्रे व त्यांचे साथीदार आऊट ऑफ कव्हरेज असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. 

दरम्यान याप्रकरणात आ. श्वेताताईंचे स्विय सहाय्यक चंद्रकांत काटकर यांनी काल बुलडाणा पोलिसांत राहुल बोंद्रे यांच्या विरोधात  मानहानी ची तक्रार दिली होती. घटनेच्या दिवशी काल,१७ मार्चला आ. श्वेताताई अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त मुंबईत असल्याने त्यांची प्रतिक्रिया माध्यमांना मिळू शकली नव्हती. आज,१८ मार्चला त्या याविषयावर पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे आमदार श्वेता ताईंच्या पत्रकार परिषदेकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. ही पत्रकार परिषद वाचकांना बुलडाणा लाइव्ह वर थेट पाहता येणार आहे.