खासदार प्रतापराव जाधवांनी लोकसभेत मांडला जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा विषय ! म्हणाले, खामगाव जालना रेल्वेमार्गाचे काम तातडीने करा....

 
खासदार

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खासदार प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा विषय मांडला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खामगाव - जालना रेल्वेमार्गाचे काम तातडीने सुरू करावे अशी आग्रही मागणी खा.जाधव यांनी लोकसभेत केली.

Dhanik
.                     जाहिरात 👆
बुलडाणा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा ठरणारा व इंग्रज काळापासून प्रलंबित असलेला खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी मंजुरात मिळाली आहे. त्यासंदर्भातील डीपीआर तयार करण्यात आलेला आहे. तसेच पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत राज्य सरकारने ५० टक्के भागीदारी देण्याची पत्रही केंद्र सरकारला दिले आहे. यासंदर्भात २९ एप्रिल २०२३ रोजी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये काही सूचना केल्या होत्या त्यातील काही बाबींची पूर्तता देखील झाली आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाला मंजुरी देऊन रेल्वे मार्गाचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी नियम ३७७ ला अधीन राहून रेल्वे मंत्र्यांकडे केली. हा रेल्वे मार्ग झाल्यामुळे मराठवाडा - विदर्भ हे दोन प्रांत जोडल्या जाणार असून जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राला चालना देणारा हा रेल्वे मार्ग ठरणार आहे तेव्हा तात्काळ मंजूर देऊन कामाला सुरुवात करावी अशी मागणी यावेळी खासदार जाधव यांनी केली.