खासदार प्रतापराव जाधवांचा वाढदिवस थाटात; जिल्हाभरात पार पडले विविध कार्यक्रम; शंकरपटाचा थरार डोळ्यांचे पारणे फेडणारा!

 महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाचे प्रदर्शन व विक्री महोत्सवाला उदंड प्रतिसाद...

 
tsfh

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तीनदा आमदार अन् सलग तीनदा खासदार अशी अलग तीस वर्षांची अजेय, अपराजित प्रदीर्घ राजकीय कारकीर्द राहिलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस सोहळा २५ नोव्हेंबरला जिल्हाभरात थाटामाटात अन् फुल्ल जोशात साजरा झाला. खा.प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गेल्या आठवड्याभरापासून जिल्हाभरात ठिकठिकाणी क्रिकेट, कबड्डी आदी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. चिखली येथे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याशिवाय सोनाटी मार्गावरील शंकरपट स्पर्धेचा थरार डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला....

DD

खा.प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त  मेहकरात महिला बचतगटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची प्रदर्शनी व विक्री मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला. महिला बचतगटांनी उत्पादित केलेला माल खरेदी करण्यासाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. यावेळी महिला बचतगटांनी उत्पादित केलेला माल खरेदी करण्यास प्राधान्य देऊन महिला सक्षमीकरणास प्राधान्य देण्याचे आवाहन खा.प्रतापराव जाधव यांनी केले.


     महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून योग्य ती पावले उचलल्या जातील असा शब्द यावेळी खा.जाधव यांनी दिला.मेहकर एज्यूकेशन सोसायटीच्या मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. प्रारंभी खा.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. याआधीच गेल्या महिन्यात खा.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते जिल्ह्यात ५ तालुका केंद्रावर महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाचे विक्री केंद्रांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. आता मेहकर येथील विक्री केंद्राचेही भूमिपूजन खा.जाधव यांच्या वाढदिवशी करण्यात आले.

add


शंकरपटाचा थरार डोळ्यांचे पारणे फेडणारा...

खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर येथे आयोजित शंकरपटाचे उद्घाटन शुक्रवारी पार पडले. ग्रामीण जनतेच्या अतिशय आवडीच्या या बैलगाडी खेळाचा आनंद लुटण्यासाठी ग्रामीण जनतेची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र यावेळी बघावयास मिळाले.

add

भूमिपूत्र खासदार जाधव यांना स्वतः या खेळाची आवड असून या खेळास प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका असते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोनाटी मार्गावरील पटांगणात शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपासच्या खेड्यापाड्यातून मोठ्या संख्येने ग्रामीण जनता हा खेळ पाहण्यास आली असल्याचे चित्र बघावयास मिळाले. लाखो रुपयांची बक्षिसे विविध नेते, कार्यकर्ते यांनी जाहीर केली होती. परभणी, बीड, लातूर, नांदेड, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, जालना, नाशिक आदी जिल्ह्यातून बैलजोडी मालकांनी आपली खिल्लारी जोडी शंकरपटात सहभागी करण्यासाठी आणल्या होत्या.