खासदार ओमराजे निंबाळकर यांची राजर्षी शाहू मल्टिस्टेटला सदिच्छा भेट!

 
ygh
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे  निंबाळकर यांनी आज, ३ मार्चला चिखली येथील राजर्षी शाहू मल्टिस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटीला सदिच्छा भेट दिली. 

dddd

           (जाहिरात👆)

 शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने खा. ओमराजे निंबाळकर सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यानिमित्त ते ३ मार्च रोजी चिखली येथे आले होते. यावेळी त्यांनी राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीला सदिच्छा भेट दिली. यावेळी राजर्षी शाहू परिवाराच्यावतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सहसचिव ऋषीकेश म्हस्के पाटील यांनी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पतसंस्थेच्या कामकाजाबद्दल खा. निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केले. 

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ता अनिश गाढवे, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, ओमप्रकाश पऱ्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राम खेडेकर, शाखा व्यवस्थापक अमोल काकडे, राजू सुरडकर, बंडू कोल्हे, भागवत डुकरे, संतोष डुकरे उपस्थित होते.