निष्ठेच्या शिदोरीवरच राजकारणात पुढे वाटचाल - जालिंदर बुधवंतांचे प्रतिपादन वाढदिवसानिमित्त पार पडले सेवा कार्याचे विविध कार्यक्रम...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संकट संधी घेऊन येत असतं, शिवसेनेमुळे आपल्यासारख्याला नाव मिळालं. सामाजिक, संघटनात्मक किंवा राजकीय पदांवर जिथे जिथे काम करण्याची संधी मिळाली तिथे आपण प्रामाणिक आणि निष्ठेनेच काम केले.
बाजार समिती असो वा अन्य ठिकाणी विकासाचा याची देही याची डोळा अनुभव घेता येतो. मातोश्रीचा आदेश हेच आपल्यासाठी सर्वस्व आहे. निष्ठाबळाच्या याच शिदोरीवर राजकारणात पुढील वाटचाल कायम राहील, अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिली.

२९ फेब्रुवारी रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी जालिंदर बुधवत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दिवसभर त्यांना भेटण्याऱ्यांची आणि शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी होती. विविध ठिकाणी अन्नदानाचे कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांना हातभार हा दरवर्षीचा शिरस्ता या वर्षी देखील जालिंदर बुधवत यांच्या मित्रमंडळाने कायम ठेवला.

 सकाळी थड तालुका मोताळा येथे महाआरती करण्यात आली. विष्णुवाडी येथे गजानन महाराज मंदिरात शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व कुटुंबीयांनी महाआरती केली. तसेच विष्णुवाडी निवासस्थानी वरूड ता. बुलडाणा येथील दिंडीतील वारकऱ्यांना वस्त्रदान जालिंधर बुधवत यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिरात १०५ जणांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला, उपजिल्हा प्रमुख सुनील घाटे यांच्याकडून लाडूतुला तर जिल्हा संघटक प्रा. गोपाल बच्छिरे यांच्याकडून लाडूतुला व जेसीबी द्वारे मोठा हार टाकून बुधवत यांचे स्वागत सत्कार करण्यात आला. 
 पळसखेड येथील सेवा संकल्प आश्रमात भोजन सेवा देण्यात आली. बुलडाणा येथील
मुकबधीर शाळेत विद्यार्थ्यांना अन्नदान कार्यक्रम, मासरूळ ता. बुलडाणा येथे वृक्षारोपण, तसेच कुलमखेड ता. बुलडाणा येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम जालिंदर बुधवत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार पडले.