लाडक्या जावयासाठी सासुरवाडी अन् लेकराच्या विजयासाठी मायभूमी एकवटली; सासुरवाडी डोंगरखंडाळ्याने संदीप शेळकेंना डोक्यावर घेतले! शिरपुरवासियांनाही वाटतोय लेकराचा अभिमान..
अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्या प्रचाराचा धुमधडाका जिल्हाभर पाहायला मिळाला आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सासुरवाडी डोंगरखंडाळा आणि जन्मभूमी शिरपूर येथे आज संदीप शेळकेंची भव्य प्रचार रॅली निघाली होती. जावयाच्या प्रचारासाठी सासुरवाडी डोंगरखंडाळा आणि जन्मभूमी शिरपूर एकवटल्याचे चित्र होते.
अपक्ष उमेदवार तथा वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी जिल्हाभर झंझावाती प्रचार केला. विकासाचे व्हिजन घेवून निघालेल्या शेळकेंना सामान्य जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. याआधी परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून त्यांनी जिल्हा पिंजून काढला आहे. विशेष म्हणजे विकासाच्या मुंद्यावर निवडणूक लढत असल्याने संदीप शेळकेंना भरभक्कम प्रतिसाद मिळत आहे. आज निघालेल्या प्रचार रॅलीत डोंगरखंडाळा, शिरपूर ग्रामस्थांनी शेळके यांचे जंगी स्वागत केले."मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी जिल्ह्याचा कायापालट करून दाखवेल, सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळावा यासाठी खासदार झाल्यावर सगळ्यात आधी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी उभारण्याचे काम करू, शेतकऱ्यांच्या कल्याण करणाऱ्या योजना कार्यान्वित करू ,सर्वांगीण विकासाच्या विविध योजना प्रत्यक्षात उतरवून जिल्ह्याचा कायापालट करून दाखवणार असल्याच्या भावना यावेळी शेळके यांनी व्यक्त केल्या. शिरपूर आणि डोंगरखंडाळा या दोन्ही गावांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, ते मी कधीही विसरणार नाही असे म्हणताना संदीप शेळके भावूक झाले होत.