लोणार येथे "मोदी सरकार हाय हाय"! एसबीआय समोर काँग्रेसचे धरणे

 
Rhhf
लोणार(प्रेम सिंगी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात मोदी सरकार विरोधात काँग्रेसने आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. लोणार तालुक्यातील काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात आज,७ फेब्रुवारी रोजी  धरणे आंदोलन करण्यात आले."मोदी सरकार हाय हाय"अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. 

केंद्रातील मोदी सरकारने उद्योगपतींवर मेहरबानी दाखवत सामान्य माणसाचा कष्टाचा पैसा धोक्यात टाकला आहे. अदानी उद्योग समुहामध्ये एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व सार्वजनीक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कोटयावधी रूपये गुंतवण्यास मोदी सरकारने भाग पाडले. वित्तीय संस्थामध्ये सर्वसामान्य, मध्यमवर्ग, नोकरदार, छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवला आहे, परंतु मोदी सरकारने अदानींच्या कंपन्यामध्ये हा पैसा जबरदस्तीने गुंतवला आहे.

अदानी समुहातील गैरकारभामुळे एलआयसीच्या ३९ कोटी पॉलिसीधारक व गुंतवणुकदारांचे ३३ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच भारतीय स्टेट बँक व इतर बँकांनी मिळुन तब्बल ८० हजार कोटी रूपयांचे कर्ज दिलाचा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम्यान मोदी सरकार विरोधात  जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे  यांच्या निर्देशानुसार तसेच लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी व शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष, शेख समद श अहमद यांच्या  नेतृत्वात लोणार तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्य सकाळी भारतीय स्टेट बँक शाखा लोणार मेहकर रोड येथे धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात तालुकाध्यक्ष राजेश मापारी, शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद, काँग्रेस ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे, उपाध्यक्ष नगरपरिषद बादशाह खान, गटनेते भूषण मापारी, आरोग्य सभापती संतोष मापारी, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष तौफिक कुरेशी, मा. नगरसेवक रहुफ भाई , माझी शहराध्यक्ष नितीन शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप ढवळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संदीप मापारी, काँग्रेस ज्येष्ठ नेते प्रदीप संचेती, ओबीसी सेल अध्यक्ष अंबादास इंगळे , रामचंद्र कोचर, काँग्रेसचे कार्यकर्ते दौलत मानकर,माजी नगरसेवक पंढरी चाटे, माजी नगरसेवक शंकर हेंद्रे, राहुल पोकळे, मनीष पाटोळे, माजी नगरसेवक बळीराम मादनकर, सिद्धार्थ अंभोरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी, शुभम चाटे आदी सहभागी झाले होते.