मनसे लढविणार बुलडाणा लोकसभेची निवडणूक! शेगावात झाली आढावा बैठक! कोण असेल उमेदवार?

 
Ndnxn
शेगांव(ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा निवडणुकीसंदर्भात अनेक उमेदवारांनी दंड थोपटले आहेत, प्रत्येक राजकीय पक्षातील इच्छुक कामाला लागलेले आहेत. अशात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील बुलडाणा लोकसभेच्या आराखड्यात उतरली आहे. अवघ्या ३ -४ महिन्यांवर निवडणुका आल्या असताना मनसेने बुलडाणा लोकसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. शेगावात काल मनसेची आढावा झाली, या बैठकीत मनसे नेते , माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांनी मनसे बुलडाणा लोकसभेची निवडणूक ताकदीने लढविणार असल्याचे सांगितले.जिल्ह्यातील मनसेचे नेते यावेळी उपस्थित होते.
"राज्यात कधी नव्हे ते राजकारण्यांनी बजबजपुरी माजवली आहे. या गढूळ वातावरणात कोणताही डाग नसलेला एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे आणि पक्ष म्हणजे मनसे आहे याची जनतेला खात्री पटली आहे. त्याचप्रमाणे बुलडाणा लोकसभा मतदार संघात मनसे साठी चांगले वातावरण आहे असे म्हणत पुढील काळात सर्वांनी पक्षाला वेळ देऊन संघटन मजबूत करण्या करिता कामाला लागण्याचे आदेश यावेळी बाविस्कर यांनी दिले . तर बैठकीचे अध्यक्ष विठठलराव लोखांडकर यांनी बुलडाणा लोकसभा मतदार संघात राज ठाकरे यांनी उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्यास जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने काम करून उमेदवार निवडून आणण्याचे काम करतील व राज ठाकरे यांनी जिल्ह्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत असा सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी यांचे तर्फे शब्द दिला दिला.