आमदार श्वेताताईंच्या हस्ते उद्या साखळी बु येथे ५,४५,४७,८०० रुपयांच्या कामाचे भूमिपूजन! सकाळी साडेआठला सोहळा...
Feb 22, 2023, 21:15 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला आहे. मतदारसंघात येणाऱ्या चिखली आणि बुलडाणा या दोन्ही तालुक्यांतील गावागावात विकासाची गंगा पोहचिण्यासाठी आ. श्वेताताई प्रयत्नशील आहेत. आज,२२ फेब्रुवारीला मकरध्वज खंडाळा, एकलारा, पाटोदा, पांढरदेव येथे आ. श्वेताताईंच्या हस्ते ५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. उद्या २३ फेब्रुवारीला बुलडाणा तालुक्यातील साखळी बू येथे सुद्धा आमदार श्वेताताईंच्या हस्ते विकासकामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे.
सकाळी साडेआठला होणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत राहणार आहेत. देउळघाट, तांदुळवाडी, इस्लामपूर, नांद्राकोळी, साखळी बु या प्रमुख जिल्हा मार्गाच्या दुरुस्तीच्या ५ कोटी ४५ लाख ४७ हजार ८०० रुपयांच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून आ. श्वेताताईंनी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. विकास एके विकास हे धोरण राबवित असल्याने संपूर्ण मतदारसंघात आ. श्वेताताईंच्या विकासकामांची जोरदार चर्चा आहे.