खामगाव - जालना रेल्वेमार्गासाठी सभागृहात आमदार श्वेताताईंनी उठवला आवाज! म्हणाल्या, राज्य सरकारने आपला हिस्सा मंजूर करावा... ​​​​​​​

 
sm
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांनी काल,२० जुलैला पावसाळी अधिवेशनात खामगाव - जालना रेल्वेमार्गाच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मागील अधिवेशनात त्यावेळी अर्थखाते सांभाळत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी खामगाव जालना रेल्वेमार्गासाठी राज्याच्या वाट्याची तरतूद करण्याचे घोषित केले होते. त्या घोषणेवर लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, राज्याचा हिस्सा देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत तात्काळ मंजूर करावा अशी मागणी आमदार श्वेताताई महाले  यांनी लावून धरली.
 

विधासभेच्या सभागृहात पहिल्यांदा आमदार श्वेताताई महाले यांनीच खामगाव जालना रेल्वेमार्गाचा मुद्दा उपस्थित केला होता. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना ४ मार्च २०२० ला  तारांकित प्रश्न आमदार श्वेताताईंनी उपस्थित केला होता. मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार राज्याचा हिस्सा द्यायला सहमती दर्शवली होती. आता त्यावर त्वरित अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचे आमदार श्वेताताई सभागृह म्हणाल्या. २८ जुलै २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जालना ते जळगाव ब्रॉडगेज मार्गासाठी राज्य सरकारने ३५५२ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली याठी आठवण सभागृहाला करून देत खामगाव - जालना रेल्वेमार्गासाठी देखील राज्य सरकारकडून अशीच अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या.