आमदार संजय रायमुलकर म्हणाले, "मी मुंबईतच..आज होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार..पण अद्याप निरोप नाही.."!

 
raymulkar
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना आज पुन्हा वेग आला आहे. काल आणि परवा दोन रात्री मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठका झाल्या. यात आता जवळपास फॉर्म्युला ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. अजित पवारांच्या सरकारमधील एंट्रीने अस्वस्थ झालेल्या शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना आणि काही भाजपच्या आमदारांना मंत्री केले जाणार आहे. या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान मिळणार नसल्याचे समजते. 
शिवसेनेच्या ४ आमदारांना मंत्री केले जाण्याची शक्यता आहे. त्यात योगेश कदम, भरत गोगावले आणि आमदार बाबर यांची नावे निश्चीत असल्याचे कळते. चौथ्या मंत्रीपदासाठी मेहकरचे आमदार संजय रायमुलकर आणि संजय शिरसाठ यांच्या नावात स्पर्धा आहे. दोघांपैकी एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान बुलडाणा लाइव्ह ने आमदार संजय रायमुलकर यांच्याशी संपर्क केला असता" आपण मुंबईतच आहोत, मंत्रिमंडळ विस्तार आज होऊ शकतो..पण आपल्याला अद्याप निरोप आला नाही" असे ते म्हणाले.