आमदार संजय गायकवाडांना नरसिंह अवताराची आठवण,म्हणाले नरडीचा घोट घेईन,त्याला फाडून खाईन...! वाचा नेमका विषय काय...
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड त्यांच्या बेधडक विधानांनी चर्चेत असतात. विधानांच्या परिणामांचाही ते विचार करीत नाहीत..आता आज, पुन्हा त्यांचे नवे विधान चर्चेत आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावर आडवे येणाऱ्याच्या नरडीचा मी घोट घेईन, त्याला फाडून खाईन असा खळबळ उडवून देणारा इशारा त्यांनी दिला. निमित्त होते मोताळ्यात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांच्या पूर्णाकृती स्मारकाच्या भुमीपुजनाचे. माजी मंत्री एकनाथ खडसे, खा. प्रतापराव जाधव, खा.रक्षा खडसे , माजी खासदार उल्हास पाटील यावेळी मंचावर उपस्थित होते.
मागील काळात मराठा आरक्षणाला द्वेष भावनेतून कडाडून विरोध करणाऱ्यामुळे गोरगरीब मराठा बांधवांचे अपरिमित नुकसान झाले. मात्र आता मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावर आडवे येणाऱ्याच्या नरडीचा घोट घेईल, त्याला फाडून खाईल असा ईशारा आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी बोलतांना दिले.
हिंसेचे समर्थन नाही पण...
आज राज्यात जी हिंसक आंदोलने होत आहेत याला मराठा तरुणांत निर्माण झालेला असंतोष कारणीभूत आहे. मी याचे समर्थ करणार नाही असे सांगून स्वतः जरांगे पाटील यांनी हिसंक आंदोलने न करण्याचे आवाहन केले आहे. गरिबीला जात आहे असे सांगून शेती आतबट्ट्याचा व्यवसाय झाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता आरक्षणाच्या आडवे येणाऱ्याची गय करणार नाही असे आमदार गायकवाड म्हणाले...